मुंबई- '' च्या नुकत्याच झालेल्या भागात, स्पर्धक अभिजीत बिचुकलेची खिल्ली उडवताना दिसत आहे. सलमानने तर त्याला सुकलेला नाना पाटेकरही म्हटले. सिद्धार्थ निगम आणि जन्नत जुबेर यांचे शोमध्ये स्वागत केल्यानंतर सलमानने त्यांचं कौतुक करण्यास सुरुवात केली. यानंतर तो अभिजीतकडे वळला आणि म्हणाला, 'डान्सचा डी, म्युझिकचा एम आणि संगीताचा एससुद्धा त्याला माहीत नाही. तो जो सुकलेला आहे, त्याला नाही येत.' त्यानंतर सलमानने अभिजीतच्या गायन कौशल्याची खिल्ली उडवत म्हणाला, 'घरात भविष्यातील एक PMS आहे. PMS म्हणजे प्राइम मिनिस्टर सिंगर (पंतप्रधान गायक.)' न्यू इअर सेलिब्रेशनसाठी शोमध्ये आलेली पलक तिवारी यावेळी 'बिग बॉस १५' मध्ये, वीकेंड का वारच्या एपिसोडमध्ये नवीन वर्षाचं मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी पलक तिवारी तिच्या 'बिजली बिजली' या हिट गाण्याच्या प्रमोशनसाठी खास पाहुणी म्हणून शोमध्ये पोहोचली होती. पलकने सलमानसोबत या गाण्यावर जबरदस्त डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर करण्यात आला. अभिनेता नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिला आहे. अशातच त्याने बिग बॉसच्या घरात देवोलिनावर अश्लिल टिप्पणी केली होती. अभिजीतने देवोलिनाकडे एका किसची मागणी केली होती. 'मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो परंतु आधी मला तू एक किस दे.' त्यानंतर त्याच्या या टिप्पणीवर सर्वच स्पर्धकांनी आक्षेप घेतला होता. राखी सावंतने त्याला ठरकी म्हटलं होतं आणि तू स्वतःला काय मिका सिंग समजतो का असा प्रश्न विचारला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32So7uD