Full Width(True/False)

एका व्यक्तीमुळे जॉन अब्राहम आणि पत्नीला झाली करोनाची लागण

मुंबई- करोनाने पुन्हा एकदा मान वरती काढली आहे. दिवसेंदिवेस दुपटीने रुग्णांची संख्या वाढत आहेत. पुन्हा एकदा याचा फटका सिनेसृष्टी आणि छोट्या पडद्यावर होताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली आहे. अभिनेत्री करिना कपूर, अमृता अरोरा, महिप कपूर आणि सीमा खान नंतर आता लोकप्रिय अभिनेता आणि त्याची पत्नी प्रिया यांनाही करोनाची लागण झाली आहे. जॉनने ही माहिती इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत चाहत्यांना दिली. स्टोरीमध्ये त्याने लिहिले की त्याला आणि त्याच्या पत्नीला करोनाची लागण झाली आहे. त्याने पुढे लिहिले की 'तीन दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो. तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचं मला नंतर कळालं आणि आता पत्नी प्रिया आणि मला करोनाची लागण झाली आहे. दोघेही होम क्वारन्टाइन झालो आहोत. आम्हा दोघांचेही लसीकरण झाले असून करोनाची सौम्य लक्षणं दिसत आहेत. कृपया स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. मास्क घालत राहा.' तसेच या दिवसांमध्ये तो इतर कोणाच्याही संपर्कात आला नसल्याचं त्याने सांगितलं. आतापर्यंत या सेलिब्रिटींना झालीए करोनाची लागण अलीकडेच, दिग्दर्शक राहुल रवैल, नोरा फतेही, मृणाल ठाकूर, अर्जुन कपूर, रणवीर शौरीचा मुलगा आणि अर्जुन कपूरची बहीण अंशुलादेखील करोनाच्या संसर्गाची शिकार झाली. यापूर्वी करिना कपूर आणि मलायका अरोराची बहीण अमृता यांच्यासह सोहेल खानची पत्नी सीमा आणि संजय कपूरची पत्नी महीप यांनाही संसर्ग झाला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3FKRQEm