Full Width(True/False)

Tata Sky चा झिंगालाला Offer! रिचार्ज करा आणि मिळवा २ महिन्याचा कॅशबॅक, ऑफर ३१ जानेवारीपर्यंत

नवी दिल्लीः : जर तुमच्या घरात टाटा स्काय असेल तसेच तुम्ही प्रत्येक महिन्यात त्याला रिचार्ज करीत असाल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. या ऑफर मध्ये तुम्हाला दोन महिन्याचा कॅशबॅक मिळेल. कंपनीने या ऑफरला आपल्या वेबसाइटवर लिस्ट केले आहे. या ऑफर अंतर्गत यूजरला एक नव्हे तर दोन महिन्यांपर्यंत कॅशबॅक दिला जाणार आहे. टाटा स्कायच्या या ऑफर संबंधी जाणून घ्या. Offer टाटा स्काय अॅप किंवा अधिकृत वेबसाइटवरून रिचार्ज करीत असाल तर तुम्हाला कॅशबॅकचा फायदा मिळेल. ही कॅशबॅक ऑफर तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही १२ महिन्याचा रिचार्ज एकाचवेळी कराल. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला रिचार्ज करीत असाल तर तुम्हाला ही ऑफर मिळणार नाही. कधी मिळणार कॅशबॅक मिळालेल्या माहितीनुसार, ७ वर्किंग डेजच्या आत तुम्हाला कॅशबॅक मिळू शकते. पहिल्या महिन्याचा कॅशबॅक ४८ तासात येईल. तर दुसऱ्या महिन्याचा कॅशबॅक ७ वर्किंग डेज मध्ये मिळू शकतो. कधी पर्यंत आहे ऑफर ऑफिशियल वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ही ऑफर १ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत आहे. या दरम्यान रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना दोन महिन्याचा कॅशबॅक दिला जाईल. या ऑफरचा फायदा फक्त एकदाच घेता येईल. या लोकांना मिळणार नाही लाभ ज्या लोकांनी आधीच वर्षभराची रिचार्ज केला आहे. त्यांना या ऑफरचा लाभ मिळणार नाही. रिचार्जवर कॅशबॅक त्याचवेळी मिळेल ज्यावेळी कंपनीच्या मोबाइल अॅप किंवा टाटा स्काय साइटवरून Deutsche Bank डेबिट कार्डचा वापर केला जाईल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pVnwkR