मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला करोनाची लागण झाली आहे. याची माहिती सुमोनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली. सुमोनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. काय लिहिले आहे सुमोनाने ने इन्स्टा स्टोरीवर पोस्ट करत म्हटले की, 'मला करोनाची सौम्य लक्षणं दिसत आहेत. थोडक्यात माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी घरातच क्वारन्टाइन आहे. गेल्या आठवड्यात माझ्या संपर्कात जे आले होते, कृपा करून त्यांनी करोना टेस्ट करून घ्यावी. धन्यवाद.' सुमोनाने कॉमेडियन म्हणून कार्यक्रमातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. कपिल शर्मासोबत सुमोनाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. सुमोनाला द कपिल शर्मा शो मधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. एका मुलाखतीमध्ये सुमोनाने तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल सांगितलं होतं की, मी फार कुणामध्ये मिसळत नाही. मी पार्ट्याही करत नाही. कार्यक्रमाचं चित्रीकरण झाल्यानंतर मी सरळ घरीच जायचे. त्यामुळे जेव्हा कधी मी पार्टीत सहभागी व्हायचे तेव्हा मी तिथे आहे हेच लोक विसरून जायचे.' तिने पुढे सांगितले की, 'अभिनेत्री म्हणून स्वतःचं अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं लक्षात आले.' तिने या मुलाखतीमध्ये पुढे सांगितलं होतं की, 'माझ्या अशा या वागण्यामुळे लोकांना वाटायचे की, गर्विष्ठ आहे, माणूसघाणी आहे. पण मी खरी तशी नाही.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qORXZj