मुंबई: आजच्या डिजिटल युगात इंटरनेटशिवाय काहीही करणे शक्य नाही. तसेच, स्मार्टफोन आणि खूपच स्वस्त किंमतीत उपलब्ध असल्याने प्रत्येकजण याचा वापर करत आहे. मात्र, या उपयोगी गोष्टीचे आता एकप्रकारे व्यसनात रुपातंर होताना दिसत आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण दिवसभर आपला वेळ फोनवर घालवताना दिसतात. लहान मुलं देखील मैदानी खेळ खेळण्याची ऐवजी आता तासंतास मोबाइलवर गेम खेळण्यात वेळ घालवत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच या ऑनलाइन गेमिंगच्या सवयीने एक लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार, मुंबईत राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाने बॅन झाल्याने आत्महत्या केली आहे. वाचा: रिपोर्टनुसार, मुलाला काही दिवसांपूर्वीच बॅन केलेल्या बॅटल रॉयल गेम गरेना फ्री फायर हा गेम खेळण्याची सवय लागली होती. आता पोलीस याबाबत तपास करत आहे. तसेच, आत्महत्येमागे गेम हे कारण आहे का हे तपासत आहेत. पोलिसांनुसार, मुलाच्या वडिलांना रविवारी सायंकाळी ७.२२ ला मुलाचा फोन आला होता. मात्र, आई-वडिल दोघेही त्यावेळी प्रवास करत असल्याने कॉल रिसिव्ह करता आला नाही. काही मिनिटांनी मुलाला पुन्हा केल्यावर त्याने कॉलला उत्तर दिले नाही. घरी परतल्यावर मुलाची रुम बंद असल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर दरवाजा उघडण्यासाठी मुलाच्या वडिलांना त्यावरील काचेच्या फ्रेमला तोडावे लागेल. त्यावेळी मुलगा मृत अवस्थेत आढळला. पोलिसांनी माहिती दिली की, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवला आहे. इंटरनेट गेमिंगचे व्यसन ठरू शकते धोकादायक
- जास्त वेळ इंटरनेट गेम्स खेळणाऱ्या मुलांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते.
- अशा मुलांचा कल जास्त करून नेगेटिव्ह मॉडेल्सवर असतो.
- मुलं स्वतःचा सयंम गमवतात.
- तसेच, त्यांना स्वतःचे म्हणणे खरे करण्याची, स्वतः नेहमीच बरोबर असल्याचे वाटते.
- मुलं स्वतःवरील नियंत्रण देखील गमवतात. अनेकदा हिंसक होतात.
- तसेच, सोशल लाइफपासून लांब एकटे राहायला त्यांना आवडते.
- मुलांचे राहणीमान आणि विचार दोन्हींवर इंटरनेट गेमिंगचा प्रभाव पडतो.
- तसेच, लठ्ठपणा आणि मधुमेह होण्याची देखील अधिक शक्यता असते.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wczpUg8