Full Width(True/False)

काल्पनिक कथेचा विस्तार: गंगुबाई काठियावाडी

'एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले... भय वेड पार त्याचे, वाऱ्यासवे पळाले... पाण्यात पाहताना, चोरूनिया क्षणैक... त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक' या ग.दि.माडगूळकर यांच्या काव्य ओळींप्रमाणे दिग्दर्शक यांनी मुंबईच्या कामाठीपुरा परिसरातील एका गंगू नामक महिलेची कथा त्यांच्या 'गंगुबाई काठियावाडी' सिनेमात सांगितली आहे. देहविक्री व्यवसाय करणाऱ्या गंगूची ही गोष्ट. त्या महिलेची किंबहुना देहविक्री करणाऱ्या त्या प्रत्येक मुलीची, स्त्रीचीच ही कहाणी आहे. हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्वीन ऑफ मुंबई' या पुस्तकावर प्रेरित 'गंगुबाई काठियावाडी' हा सिनेमा आहे. पण, पुस्तकातील कथानकापासून पडद्यापर्यंतच्या प्रवासात पटकथा लेखक म्हणून भन्साळी यांनी प्रचंड कल्पनाविलास केला आहे. जो कदाचित अनेक साहित्यप्रेमींना, वाचकांना खटकू शकतो. त्यामुळे सिनेमा पाहताना त्याची सांगड आपण सत्याशी न घातलेलीच बरी... केवळ एका व्यावसायिक सिनेमाचं कथानक म्हणूनच त्याच्याकडे पाहायला हवं. कारण, एका व्यावसायिक सिनेमाला आवश्यक त्या सर्व गोष्टी या सिनेमात खच्चून भरलेल्या आहेत. अॅक्शन, नाच-गाणं, देदिप्यमान सेट, नाट्य आणि रोमान्स सर्व काही या सिनेमात आहे. त्यामुळे सिनेमा कंटाळवाणा वाटत नाही. सिनेमातील एक प्रसंग आहे; 'इथे बसलेल्या प्रत्येकाचा कोणता ना कोणता तरी व्यवसाय नक्कीच असेल. कोणी डॉक्टर, इंजिनीअर, कोणी शिक्षक तर कोणी वकील असेल. कोणी चणे विकत असेल तर कोणी कपडे. बुद्धिमान व्यक्ती त्याची बुद्धी विकतो. आमचा व्यवसाय हा शरीराचा आहे; आम्ही शरीर विकतो. यात गैर काय?' असा सवाल गंगुबाई आझाद मैदानात जमलेल्या तमाम नागरिकांना करते. हाच सवाल ती कदाचित आपल्याला करु पाहतेय. समाजात स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी अनेक महिलांना संघर्षांचा सामना करावा लागतो. अशाच महिलांपैकी एक म्हणजे गंगूबाई आहे. गंगुबाईनं देहविक्री करणाऱ्या महिलांच्या, त्यांच्या मुला-बाळांच्या हक्कांसाठी लढा दिला. हाच लढा 'गंगुबाई काठियावाडी' सिनेमात आहे. गंगा जीवनदास काठियावड () नावाची मुलगी रमणीक नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते. सिनेमात अभिनेत्री होण्याचं स्वप्न उराशी बाळगून ती रमणीकसह गुजरातहून मुंबईला येते. पण, नियतीचा खेळ असा काही घडतो की रमणीक गंगाला देहविक्री व्यवसाय करणाऱ्या कामाठीपुरामधील महिलेला हजार रुपयांना विकतो. सिनेमाचं कथानक वेगवेगळी वळणं घेतं आणि 'गंगा'चं 'गंगू' होतं. पुढे 'गंगू'चं कामाठीपुरामधील प्रस्थ वाढतं आणि ती 'गंगुबाई' म्हणून संबोधली जाते. हाच सर्व लेखाजोखा सिनेमात दडलेला आहे. भन्साळी यांचा सिनेमा म्हटलं की भव्यदिव्य सेट, संगीत हे आलंच. त्यामुळे त्यांच्या नावाला साजेसा हा सिनेमा आहे. आलियानं साकारलेली गंगुबाईची भूमिका प्रभाव पाडणारी आहे. गंगुबाईची स्टाइल तिनं अचूक पकडली आहे. तिनं ही भूमिका इतकी आत्मसात केलीय की, सिनेमात कुठेही 'अभिनेत्री आलिया भट'चा ऑरा नजरेस पडत नाही. दिसते ती फक्त गंगुबाईच! अगदी एका राजहंसाप्रमाणे आलियानं तिचं वेगळेपण या सिनेमात सिद्ध केलं आहे. दुसरीकडे नं त्याच्या वाट्याला आलेली छोटी भूमिका प्रामाणिकपणे साकारली आहे. तसंच विजय राज, इंदिरा तिवारी, छाया कदम यांचं कामंही कौतुकास्पद झालं आहे. सिनेमाचा कलादिग्दर्शकीय अवकाश, संगीत आणि छायांकन सिनेमाला उंचावतात. परिणामी आपल्याला नेत्रदीपक आणि सुरेल अनुभव या सिनेमाच्या निमित्त मिळतो. सिनेमातील काही प्रसंग आणि संदर्भ वादग्रस्त ठरू शकणारे आहेत. परंतु, हा सर्व खेळ सत्याचा आधार घेऊन काल्पनिक कथेचा विस्तार आहे. हे आपण समजून घ्यायला हवं. बाकी 'गंगुबाई काठियावाडी' हा सिनेमा म्हणून नक्कीच बघण्याजोगा आहे. विशेषत: आलियाच्या अभिनयासाठी...! सिनेमा : गंगुबाई काठियावाडी निर्मिती : जयंतीलाल गडा, संजय लीला भन्साळी दिग्दर्शक-पटकथा-संकलन-संगीत : संजय लीला भन्साळी कलाकार : आलिया भट्ट, अजय देवगण छायांकन : सुदीप चटर्जी दर्जा : साडेतीन स्टार


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/91aLGC3