Full Width(True/False)

होळीला क्लिक करा भन्नाट फोटो, ऑफर्ससह घरी आणा १०८ MP कॅमेरा असणारा Redmi Note 11 Pro+ 5G, आज पहिला सेल

नवी दिल्ली: Redmi Note 11 Pro, Redmi Note 11 Pro + 5G काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आले असून यापैकी, Redmi Note 11 Pro + 5G चा पहिला सेल Amazon वर आज दुपारी १२ वाजता सुरु होणार आहे. हा फोन Android 11 सह Snapdragon 695 SoC सह येतो. त्याची किंमत २०,९९९ रुपयांपासून सुरू होते. तुम्ही हा फोन Amazon, Mi.com, Reliance Digital यासह रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकता. जाणून घेऊया Redmi Note 11 Pro + 5G ची किंमत आणि ऑफर्स. Redmi Note 11 Pro + 5G ची किंमत आणि ऑफर: या फोनच्या ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत २०,९९९ रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे. हे डिव्हाइस ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजमध्ये देखील उपलब्ध आहे. ज्याची किंमत २४,९९९ रुपये आहे. वाचा: Redmi Note 11 Pro + 5G मिराज ब्लू, फँटम व्हाइट आणि स्टेल्थ ब्लॅक कलरमध्ये हे खरेदी करता येईल. ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, HDFC बँकेच्या कार्डांवर १००० रुपयांची सूट दिली जाईल. Redmi Note 11 Pro + 5G ची वैशिष्ट्ये: हा फोन ड्युअल-सिम (नॅनो) ला सपोर्ट करतो. यात Android 11 वर MIUI 13 स्किन आहे. तसेच, ६.६७ -इंचाचा फुल-एचडी + (1080x2400 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा रिफ्रेश दर १२० Hz आहे. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC सह सुसज्ज आहे. यात ८ GB पर्यंत RAM आहे. तसेच यामध्ये २५६ GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी Redmi Note 11 Pro + 5G मध्ये f/१.९ लेन्ससह १०८ -मेगापिक्सेल Samsung HM2 प्रायमरी सेन्सर आहे. त्याच वेळी, आणखी एक f/२.२ लेन्ससह ८-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तिसरा f/२.४ लेन्ससह २-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये f/२.४५ लेन्ससह १६-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. Redmi Note 11 Pro+ 5G वरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, IR ब्लास्टर, USB Type-C आणि ३.५ mm हेडफोन जॅक समाविष्ट आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे. जी, ६७ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/gcnxS1r