Full Width(True/False)

Photos- बॅकलेस ड्रेसमध्ये शाहरुखच्या लेकीने केलं घायाळ

मुंबई- शाहरुख खानची मुलगी कुठल्याही सुंदर अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ती सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते. तिच्या पोस्ट नेहमीच इंटरनेटवर व्हायरल होत असतात. नुकतंच सुहानाने फोटो शूट केलं आहे, ज्याने नेटकाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या फोटोमधल्या तिच्या देसी लूकने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तिचा किलर लूक्स पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने सुहानाचे हे फोटो त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुहाना खानने पांढऱ्या रंगाचा बॅकलेस ब्लाऊज आणि लेहेंगा घातला आहे. त्यावर एक सुंदर ओढणी देखील घेतली आहे. केसांचा पाॅनीटेल, कानात झुमके आणि कपाळावर टिकली अशी सुहाना नटली आहे. ती या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत असून कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोझ देत आहे. सुहानाचे सुंदर फोटो शेअर करताना मनीष मल्होत्राने कॅप्शनमध्ये 'सुहाना' असं लिहिलं आहे. यासोबतच त्याने त्यावर हार्ट इमोजीही दिले आहेत. गौरी खानने देखील आपल्या मुलीचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'प्युअर' असं लिहिलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत तिच्या या देसी लूकचं कौतुक करत आहेत. बॉलिवूड पदार्पण गेल्या अनेक दिवसांपासून सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुहाना खान बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात झोया अख्तरच्या चित्रपटातून करणार आहे, जो आर्ची कॉमिक्सवर आधारित आहे. बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. सुहाना खानला देखील वडिलांप्रमाणेच चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमवायचं आहे. याआधी तिने 'द ग्रेट पार्ट ऑफ ब्लू' या शॉर्टफिल्ममध्ये आपलं अभिनय कौशल्य दाखवलं होतं, त्याची खूप चर्चा झाली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/HxBoqUN