Full Width(True/False)

कोण आहे पाकिस्तानी अभिनेत्री जिच्या प्रेमात बुडालाय शोएब मलिक

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक सध्याचर्चेत आहेत. बऱ्याच दिवसांपासून सानिया पाकिस्तानी क्रिकेटर शोएबपासून घटस्फोट घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. आतापर्यंत या जोडप्याने याबाबत पुढे येऊन काहीही सांगितलं नाही. पण नेटकऱ्यांना मात्र शोएब आणि सानियाच्या घटस्फोटाचं कारण सापडलं आहे. या प्रकरणाशी पाकिस्तानी अभिनेत्रीचा थेट संबंध असल्याचे अनेक युजर्सचं मत आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये, पाकिस्तानी क्रिकेटर आणि सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकने एक फोटोशूट केलं होतं. प्रसिद्ध पाकिस्तानी मासिकासाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री आयशा उमर दिसली होती. दोघांचे फोटो आणि पोज खूपच बोल्ड होते आणि त्यांची केमिस्ट्री सर्वांना दिसून येत होती. अशा परिस्थितीत आता घटस्फोटाच्या बातम्यांमध्ये तेच फोटो व्हायरल झाले आहेत. ज्या व्यक्तीमुळे सानियाचं घर तुटत आहे, ती आयशा उमर असल्याचं बोललं जात आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/zmdUS5t