बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याचा आज वाढदिवस. अर्जुननं मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी या ना त्या कारणांमुळं तो चर्चेत असतो. अनेकदा सिनेमांमुळं, खासगी आयुष्यामुळं त्याची चर्चा होते. त्याला ट्रोल करण्यात येतं.पण स्टार किड असलेल्या , बॉलिवूडच्या बड्या कुटुंबात जन्माला आलेल्या अर्जुनच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. करिअरमध्ये तसंच खासगी आयुष्यातही. लहानपणीच आईचं जाणं, सावत्र आई-भावंडांसोबतचा दुरावा, यामुळं अर्जुन खूप खचला होता. पण मलायकाच्या रुपानं त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/86sgAid