Full Width(True/False)

नगर जिल्‍हयातील सर्व भाजीपाला बाजार 3 मेपर्यंत बंदच राहणार


अहमदनगर दि.२९ – कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून  जिल्‍हयातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी  जिल्‍हयातील सर्व भाजीपाला बाजार दिनांक ०३ मेपर्यंत बंद  राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. तसेच भाजीपाला विक्री करणारे लोकांना फेरीद्वारे किंवा एखाद्या ठिकाणी बसून (फक्‍त एकाच भाजीपाला विकेत्‍यास गर्दी टाळून) परवानगी राहील.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी यापूर्वी जिल्‍हयातील सर्व भाजीपाला बाजार दि. 30 एप्रिल 2020 चे मध्‍यरात्री पर्यत बंद करण्याबाबतचा आदेश लागू करण्यात आला होता. मात्र, केंद्र शासनाने लॉकडाऊनचा कालावधी दिनांक ०३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

कोणतीही  व्‍यक्‍ती  संस्‍था,  संघटना यांनी  या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास  ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे जिल्‍हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.