मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखला जाणारा चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. उमेशच्या चाहत्यांची संख्यादेखील बरीच आहे. उमेशला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात. उमेशच्या 'आणखी काय हवं' वेबसीरिजला देखील प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला होता. आपल्या अभिनयाने आणि सोज्वळ हसण्याने चाहत्यांना भुरळ पाडणारा उमेश पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. उमेश सोनी मराठीवरील '' या मालिकेत झळकणार आहे. परंतु, उमेश गेली आठ वर्ष छोट्या पडद्यापासून दूर होता. तब्बल आठ वर्षानंतर उमेश छोट्या पडद्यावर पुन्हा पदार्पण करत आहे. मालिकेच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत उमेशने आठ वर्ष मालिकांपासून दूर राहण्याचं कारण सांगितलं. उमेश म्हणाला, 'गेल्या अनेक वर्षात मला कित्येक भूमिका ऑफर झाल्या. अनेक भूमिकांसाठी मला विचारणा करण्यात आली. परंतु, त्या भूमिकांमध्ये कोणतंही वेगळेपण नसल्याने मी त्यांना नकार दिला. पण 'अजूनही बरसात आहे' मालिकेत मला मला ते वेगळेपण मिळालं. मालिकेतील पात्र मला हवं तसं असल्याने मी मालिकेला होकार दिला. त्यासाठी मला आठ वर्ष वाट पाहावी लागली.' यासोबत उमेश म्हणाला, 'भूमिकेसोबतच आणखी एक कारण म्हणजे अभिनेत्री . ती एक खूप हुशार अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करताना नक्की काहीतरी नवीन शिकायला मिळणार याची मला खात्री होती. ही माझ्यासाठी एक संधी होती. तिच्यासोबत काम करणं एक पर्वणी आहे. त्यामुळे ही संधी मी सोडणार नव्हतो. सोबतच मालिकेच्या निर्मात्यामुळे मी कार्यक्रमासाठी हो म्हणालो.' उमेशच्या छोट्या पडद्यावर परतण्याचं कारण काहीही असलं तरी प्रेक्षक मात्र त्याला पाहण्यास प्रचंड उत्सुक आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3AkjqpE