Full Width(True/False)

केशरी शिधापत्रिकाधारकांना दोन महिन्‍यासाठी मिळणार गहू आणि तांदूळ.



अहमदनगर दि. 28- नगर तालुक्‍यात नोव्‍हेल कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवीर राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजने अंतर्गत समाविष्‍ट होऊ  न शकलेल्‍या एपीएल (केशरी शिधापत्रिकाधारक)  धारकांना माहे मे ते जून 2020 या दोन महिन्‍याच्‍या कालावधीत सवलतीच्‍या दाराने अन्‍नधान्‍याचा लाभ देण्‍यात येणार आहे. नगर तालुक्‍यात 15 हजार 458 शिधापत्रिकाधारक असून एकूण  69 हजार 146 लाभार्थी  आहेत. त्‍यांना गहू 2 हजार 30 क्विंटल व तांदूळ 1 हजार 355 क्विंटल  अन्‍नधान्‍य गहू 8 रुपये व तांदूळ 12 रुपये प्रती किलो या दराने  प्रति माह प्रति व्‍यक्‍ती गहू 3 कि व तांदूळ 2 कि असे  एकूण 5 किलो अन्‍नधान्‍य वितरीत करण्‍यात येणार आहे.

ज्‍या एपीएल (केसरी शिधापत्रिका) धारकांना सवलतीच्‍या दराने अन्‍नधान्‍य वाटप करण्‍यात येणार आहे. त्‍या शिधापत्रिका  धारकांच्‍या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्‍या नसतील अथवा त्‍या शिधापत्रिकांचे आधार सिडींग झाले नसले, तरी त्‍या शिधापत्रिका धारकांना विहीत केलेल्‍या दराने व परिमाणात धान्‍य देण्‍यात येणार आहे. तसेच ज्‍या शिधापत्रिका धारकांच्‍या शिधापत्रिकेवर बारा अंकी नोंदणी क्रमांक नाही त्‍या शिधापत्रिकाधारकांनाही  या योजनेचा लाभ घेता येईल. अन्‍नधान्‍य वितरणाची प्रक्रिया सुरु  करण्‍यात आली आहे, असे तालुका दंडाधिकारी तथा अध्‍यक्ष आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अहमदनगर उमेश पाटील यांनी कळविले आहे.       
साभार - जिल्हा माहिती कार्यलय, नगर जिल्हा