Full Width(True/False)

लॉकडाऊनमध्ये रेल्वेने पुन्हा सुरु केली भरती; परीक्षेशिवाय नोकऱ्या



East Coast Railway Recruitment 2020: लॉकडाऊनमध्ये भारतीय रेल्वेने नोकरी मिळण्याची संधी पुन्हा एकवार चालून आली आहे. ही भरती ईस्ट कोस्ट रेल्वेमध्ये होत आहे. ५५० हून अधिक पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी झाली आहे. अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. रेल्वेद्वारे योग्य उमेदवारांना परीक्षेशिवाय रिक्त पदांवर नोकरी दिली जाणार आहे. दहावी उत्तीर्णांपासून डिप्लोमाधारकांपर्यंत तसेच विशेष शाखेत पदवीधर असणारे उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

पदांची माहिती - नर्सिंग सुपरिटेंडंट - २५५ पदे फार्मासिस्ट - ५१ पदे ड्रेसर / ओटीए / हॉस्पिटल अटेंडंट - २५५ पदे एकूण पदे - ५६१ 

अर्ज कसा करायचा? या नोकऱ्यांसाठी अर्ज ईमेलद्वारे पाठवायचे आहेत. यासाठी पुढे दिलेले नोटीफिकेशन डाऊनलोड करा. त्या नोटिफिकेशनच्या अखेरीस फॉर्म दिलेला आहे. त्याचं प्रिंट काढून ते भरायचं आहे. त्यानंतर भरलेला फॉर्म सोबत मागितलेल्या आवश्यत प्रमाणपत्राच्या प्रतींसह पुढील ईमेल आयडी वर पाठवायचे आहे - srdmohkur@gmail.com अर्ज करण्याची अखेरची तारीख - २२ मे २०२० आहे. अर्जासाठी कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. निवड प्रक्रिया - या पदांवर नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मेरिटच्या आधारे कागदपत्रांच्या सत्यपडताळणीनंतर थेट भरती होणार आहे. 

आवश्यक पात्रता विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे. ड्रेसर / ओटीए / हॉस्पिटल अटेंडंट - मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण. वयोमर्यात १८ ते ३३ वर्षे. (आरक्षणानुसार सवलत) फार्मासिस्ट - विज्ञान विषय घेऊन १२ वी उत्तीर्ण. मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी डिप्लोमा आवश्यक. वयोमर्यादा २० ते ३५ वर्षे. (आरक्षणानुसार सवलत) नर्सिंग सुपरिटेंडंट - बीएससी नर्सिंग किंवा जनरल नर्सिंग किंवा मिडवायफरीचा तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केलेला असावा. वयोमर्यादा २० ते ३८ वर्षे. (आरक्षणानुसार सवलत) वयोमर्यादेसाठी १ मे २०२० ही तारीख निश्चित केली आहे.

For more information Please Click - https://ift.tt/2X10LfN