करोना व्हायरसचा जगभरात प्रसार झालेला असला आणि चिंताग्रस्त वातावरण असले तरी एक लीग मात्र आजपासून सुरु झाली आहे. पण ही लीग पाहायला नेमके कोण कोण आले होते, याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल, त्यासाठी हा खास व्हिडीओ पाहा... करोना व्हायरसमुळे महत्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धा कधी खेळवायच्या हा प्रश्न काही क्रीडा संघटनांना पडलेला आहे.
कारण सध्याच्या घडीला तरी खेळाडू आपल्या घरीच आहेत. त्यांना लगेच मैदानात कसे उतरवायचे, त्यासाठी सुरक्षिततेचे कोणते उपाय करायचे, यावर सध्या विचार सुरु आहे. त्यामुळे काही महत्वाच्या स्पर्धा सध्या तरी सुरु झालेल्या दिसत नाही. पण या गोष्टीला एक लीग मात्र अपवाद ठरली आहे. कारण या लीगचे सामने आजडपासून सुरु करण्यात आले आहेत. करोना व्हायरस असला तरी किती दिवस सर्व गोष्टी ठप्प ठेवायच्या हा निर्णय एका देशाने घेतला. त्यामुळे लॉकडाऊन सुरु असतानाही त्यांनी एका लीगला सुरु करण्यास परवानगी दिली आणि त्यामुळेच आजपासून ही लीग सुरु करण्यात आली आहे. या देशाच्या पंतप्रधानांनी ही लीग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही लीग आजपासून सुरु करण्यात आली आहे.
ही लीग नेमकी कोणती...ही जर्मनीतील बुंदेसलिगा लीग आहे. ही फुटबॉलची लीग असून ती जगभात प्रसिद्ध आहे. या लीगच्या एकाच संघांतीन तिघांना करोना झाला होता. त्यामुळे ही लीग सुरु करायची की नाही, याबाबत संभ्रम होता. पण लीगचे आयोजक मात्र ही सुरु करण्याच्या विचार करत होते. क्रीडा मंत्र्यांनी या गोष्टीची गंभीरपणे दखल घेतली. त्यांनी परिस्थिती पाहिली. सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल पाहिले आणि त्यांनादेखील ही लीग सुरु व्हावी, असे वाटत होते. पण पंतप्रधानांच्या परवानगीशिवाय ही लीग सुरु होऊ शकत नाही. पंतप्रधानांनीही या लीगची सर्व माहिती मागवून घेतली होती. याबाबत तीन दिवसांत निर्णय देणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले होते. त्यानुसार पंतप्रधानांनी तीन दिवसांत निर्णय घेतला आणि या लीगला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळेच आजपासून या लीगच्या सामन्यांना सुरुवात करण्यात आली आहे.