Full Width(True/False)

NEET 2020 अर्ज दुरुस्ती प्रक्रियेला मुदतवाढ



नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पुन्हा एकदा अर्जात बदल करण्याच्या व परीक्षेचे शहर बदलण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. आता अर्जातील दुरुस्ती आणि परीक्षा शहरात बदल ३१ मे २०२० पर्यंत करता येतील. यासंदर्भात एनटीएने अधिकृत वेबसाइट ntaneet.nic.in वर परिपत्रक जारी केले आहे. 

यानुसार, NEET UG 2020 च्या सर्व उमेदवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा (शहर व केंद्रातही बदल) ntaneet.nic.in वर सुरू आहे आणि ही सुविधा ३१ मे पर्यंत राहील. विद्यार्थी वेबसाइटला भेट देऊन त्यांच्या माहितीची पडताळणी करू शकतात आणि आवश्यक असल्यास आवश्यक दुरुस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

ऑनलाईन अर्जात केलेली दुरुस्ती ३१ मे रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होईल तर अर्जाचे शुल्क रात्री ११.५० वाजेपर्यंत भरता येतील. उमेदवार क्रेडिट (डेबिट कार्ड / नेट बँकिंग / यूपीआय आणि पेटीएम) द्वारे आवश्यक (अतिरिक्त) फी (लागू असल्यास) भरू शकतात. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेण्यात येणारी नीट प्रवेश परीक्षा २६ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. 

एनईईटी परीक्षेशी संबंधित प्रत्येक माहितीसाठी केवळ अधिकृत वेबसाइटवर अवलंबून राहण्याचा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे.