मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती ट्विटर, इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. पण आता सोनाक्षीने तिचं ट्विटर अकाउंट डिअॅक्टिवेट केलं आहे. आपली मानसिक शांती वाचवण्यासाठी तिने हे पाऊल उचलल्याचं सोनाक्षी म्हणाली. डिअॅक्टिवेट केलं ट्विटर अकाउंट- सोनाक्षीने शनिवारी इन्स्टाग्रामवर स्पष्ट केलं की ती ट्विटरवर नाहीये. यासंबंधीचा एक स्क्रिनशॉट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''आग लगे बस्ती में... मैं अपनी मस्ती में! बाय ट्वीटर' इन्स्टाग्रामवरही कमेन्ट दिसणं थांबवलं- सोनाक्षीने ट्विटरवरील जो स्क्रीनशॉट शेअर केला त्यात लिहिले होते की, 'स्वतःची मनःशांती वाचवण्यासाठी मी स्वतःला नकारात्मकतेपासून वाचवत आहे. याचसाठी ट्विटरपासून स्वतःला दूर केलं आहे. चला.. मी जाते.. मी माझं ट्विटर अकाउंट डिअॅक्टिवेट करत आहे.' ही पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकल्यानंतर तिने काही वेळानंतर ट्विटर अकाउंट डिअॅक्टिवेट केलं. यासोबतच तिने इन्स्टाग्रामवरील कमेन्टही बंद केल्या आहेत. सोशल मीडियावर ट्रोल होतेय सोनाक्षी- सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर सोनाक्षी सिन्हाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. लोकांच्यामते, सोनाक्षीसारख्या लोकांमुळे बॉलिवूडमध्ये चांगल्या लोकांना कामं मिळत नाहीत असा आरोप करण्यात आला. प्रतिभावान लोकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे आणि सोनाक्षीसारख्या लोकांना काम दिलं जात आहे. बॉलिवूड माफिया म्हटल्या जाणाऱ्यांचं सोनाक्षीने केलं होतं समर्थन- ज्या लोकांना बॉलिवूड माफिया म्हटलं जात होतं त्या सर्वांचं सोनाक्षीने समर्थन केलं. सोनाक्षी म्हणाली की, काही लोक सुशांतच्या मृत्यूची पब्लिसिटी करत आहेत. यावेळी सोनाक्षीने ट्रोल करणाऱ्यांची कठोर शब्दात निंदा केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YQsVem