Full Width(True/False)

मिलिंद सोमणने योगाभ्यासातून दाखवला स्वॅग

मुंबई- आज देशभरात उत्साहाने योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अभिनेता मिलिंद सोमणने वेगळ्या पद्धतीने योगसाधना केली आणि सोशल मीडियावर योग साधनेचं महत्त्वही समजावून सांगितलं. मिलिंदने इन्स्टाग्रामवर घरातच भाज्या पिकवल्याचा फोटो शेअर केला. यात तो एका पायावर उभा असलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, माझ्यासाठी योग म्हणजे वर्तमानात शांती आणि बुद्धीमत्तेसोबत समतोल साधणं आहे. सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा. सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. तो नवनवीन पोस्ट शेअर करून सतत चर्चेत असतो. याआधी मिलिंदने टरबूज घेऊन अनोख्या पद्धतीने व्यायाम केल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. अनेकजण त्याला फिटनेससाठी आपलं आयडिअल मानतात. मिलिंदचे अनेक फिटनेस व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. मिलिंदही अनेकदा त्याचे फिटनेस सिक्रेट चाहत्यांसोबत शेअर करून त्यांना प्रेरित करत असतो. सकाळच्या नाश्त्यात मिलिंद ऋतूनूसार येणारी फळं खातो. त्याच्या दिवसाची सुरुवात फळं खाऊनच होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मिलिंद टरबूज, पपई, आंबे केळी अशी फळं खाताना दिसतो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YnrZ2d