मुंबई- भारतातील सर्वात मोठी म्युझिक कंपनी म्हणून ओळखली जाणारी टी-सीरिज सध्या अनेकांच्या निशाण्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी टी-सीरिज आणि त्याचे मालक भूषण कुमारवर भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनेही भूषण कुमारला फटकारलं आहे. सोशल मीडियावर चित्रपट सेनेला लोकांचा पाठिंबा मिळत आहे. टी-सीरिजला मिळाली ताकीद- टी-सीरिजने त्यांच्या चॅनलवर पाकिस्तानी गायक आतिफ असलमची गाणी अपलोड केली. देशात पाकिस्तानसोबतची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असतानाही भूषणने यूट्यूब चॅनलवर आतिफची गाणी अपलोड केली. याच गोष्टींचा अनेकांना राग आला. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष यांनी तिखट शब्दात भूषण कुमारला फटकारले. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'टी-सीरिजला ताकीद.. पाकिस्तानी गायक आतिफ असलमची गाणी टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनलवरून ताबडतोब काढून टाकावी. नाही तर याविरोधात आम्ही कार्यवाई करू.' भूषण कुमारने क्षमा मागितली- अमेय खोपकरांची धमकी आणि लोकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन भूषण कुमारने तातडीने माफी मागितली आणि आतिफची गाणी यूट्यूबवरून काढल्याचंही स्पष्ट केलं. जेव्हापासून आतिफची गाणी यूट्यूबवर अपलोड करण्यात आली तेव्हापासून #UnsusbcriberTseries हा हॅशटॅग ट्रेण्ड करू लागला. जगभरातील सर्वाधिक सबस्क्राइब करण्यात आलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये टी-सीरिजचा उल्लेख होतो. दरम्यान, सोनू निगम, सुनील पाल, मोनाली ठाकुर आणि अदनान सामी यांनी ही भूषण कुमारवर अनेक गंभीर आरोप करत नव्या दमाच्या लोकांना फारशी संधी देत नसल्याचं आणि भेदभाव करत असल्याचं सांगितलं. सोनू निगमने भूषण कुमारच्या सांगितल्या अनेक गोष्टी- सोनू निगमने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात त्याने स्पष्ट म्हटलं की, 'तो माफिया आहे तर माफियासारखाच वागणार. त्याच्यासाठी हे रोजचं आहे. त्याने सहा लोकांना माझ्याविरुद्ध मुलाखत द्यायला सांगितलं. मी कोणाचं नाव घेतलं नव्हतं पण आता माझं नाव घेतलं जात आहे.' ' आता तुझं नाव तर मला घ्यावच लागेल. आता तुला अरे- तुरेच करावं लागेल. तू चुकीच्या व्यक्तीविरोधात उभा राहिलास. ते दिवस विसरलास का जेव्हा तू बोलायचास की माझा एखादा अल्बम कर.. सर्वांना वेड लागलं पाहिजे.. मला बाळासाहेब ठाकरेंची भेट घालून दे.. अबू सालेमपासून वाचव.. या सर्व गोष्टी लक्षात आहेत की नाही... मी अजूनही तुला सांगतो की माझ्या तोंडी तू लागू नकोस.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Vew86v