Full Width(True/False)

२५ दिवसांच्या शुटिंगचे 'जेठालाल' घेतो ३६ लाख

मुंबई- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेला लोकांनी भरभरून प्रेमदिलं. एवढ्या वर्षांनंतरही लोकांची या मालिकेसाठीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. या मालिकेतील जेठालालची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दिलीप जोशीचंही जबरदस्त फॅनफॉलोविंग आहे. फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्यांना महागड्या गाड्या विकत घेण्याची क्रेझ आहे. याशिवाय २५ दिवसांच्या चित्रीकरणासाठी जवळपास ३६ लाख रुपयांचं मानधन घेतात. याशिवाय त्यांच्या खासगी आयुष्यातील फारशा माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊ.. दिलीप जोशी यांची आवडती गाडी- रिपोर्टनुसार, दिलीप यांना गाड्यांची फार आवडत आहे. त्यांच्याकडे अनेक गाड्यांचं कलेक्शनही आहे. त्यांच्याकडे ज्या गाड्या आहेत त्यापैकी ऑडी- क्यू ७ ही आहे. या गाडीची किंमत जवळपास ८० लाख रुपये आहे. याशिवाय इनोवाही आहे. या गाडीची किंमतही १४ लाखांच्या घरात आहे. २५ दिवस करतात मालिकेचं चित्रीकरण- दिलीप जोशी या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ३० पैकी २५ दिवस काम करतात. या २५ दिवसांसाठी ते जवळपास ३६ लाख रुपयांचं मानधन घेतात. एक वेळी अशी होती की दिलीप यांच्याकडे काम नव्हतं- मीडिया रिपोर्टनुसार, दिलीप जोशी यांनी मालिकांशिवाय अनेक सिनेमांमध्येही काम केलं आहे. असं असूनही एक वेळ असी होती की, त्यांना कोणी काम देत नव्हतं. तारक मेहता मालिका साइन करण्याच्या १ वर्ष आधी त्यांच्याकडे काम नव्हतं. मात्र या मालिकेने त्यांचं नशिब बदललं आणि यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. दिलीप जोशीच्या पत्नीचं नाव- दिलीप जोशी यांच्या अभिनयाचं तर सारेच कौतुक करतात. त्यांच्या संवाद फेकीमुळे प्रेक्षकांच्या आवडत्या व्यक्तीरेखांमध्ये ही व्यक्तीरेखा अग्रणी आहे. दिलीप जोशी यांच्या पत्नीचं नाव जयमाला असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यात मालिकेला १२ वर्ष पूर्ण होणार आहेत. आतापर्यंत या मालिकेचे २ हजार ९५० भाग पूर्ण झाले आहेत. या १२ वर्षांमध्ये मालिकेत अनेक कलाकार तेच राहिले तर काही कलाकार हे बदलत राहिले. २८ जुलै २००८ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला होता. गेल्या १२ वर्षांपासून ही मालिका टीआपीच्या शर्यतीत असून टॉप १० मधील आपली जागा कधीही सोडली नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Bdwzaf