मुंबई: गुणवान अभिनेत्री म्हणून हिनं आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनयात ठसा उमटवणारी राधिका आता दिग्दर्शनातही आपली छाप पाडू पाहतेय. राधिकानं '' या लघुपटाद्वारे दिग्दर्शनात पाऊल टाकलं आहे. तिच्या या शॉर्टफिल्मची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. 'पाल्म्स स्प्रिंग आंतरराष्ट्रीय शॉर्ट फेस्टिव्हल'मध्ये तिच्या या शॉर्ट फिल्मला पुरस्कार जाहीर झालाय. या लघुपटाला '' मिळाला असून, या लघुपटासाठी कथालेखनही तिनं केलंय. राधिकानं आजवर अनेक सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आता लघुपट दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळवल्यानं चाहत्यांना तिच्याकडून दर्जेदार सिनेमाची अपेक्षा आहे. या पुरस्कारासाठी राधिकानं 'पाल्म्स स्प्रिंग आंतरराष्ट्रीय शॉर्ट फेस्टिव्हल'च्या आयोजकांचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार मिळाल्यानं आनंद झाल्याचं राधिकानं ट्विट केलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधिका म्हणाली, की 'शॉर्टफिल्मच्या दिग्दर्शनाच्या कामाचा मी खूप आनंद घेतला. मी याबद्दल खूपच उत्सुक आहे. प्रेक्षकांना ही शॉर्टफिल्म लवकरच पाहता येणार आहे. दिग्दर्शक म्हणून मला आणखी काम करण्याची संधी मिळेल.' या लघुपटात शहाना गोस्वामी आणि गुलशन देवैया यांच्या मुख्य भूमिका आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Nw66au