मुंबई: अभिनेता यानं आत्महत्या केल्यानंतर आता त्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा मृत्यू गळफास घेतल्यानंच झाला असल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून सुशांतच्या बहिणीसह सहा जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणी आज सुशांतची जवळची मैत्रीण हिचा जबाब नोंदवण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून रिया आणि सुशांत एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळं रियाची चौकशी आणि तिनं नोंदवलेला जबाब महत्त्वाचा ठरणार आहे. रिया आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वांद्रे पोलिस ठाण्यात आली होती. त्यानंतर तब्बल सहा तास तिची चौकशी करण्यात आली. संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास रिया वांद्रे पोलिस ठाण्यातून बाहेर पडली. आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वी रिया सुशांतचं घर सोडून तिच्या घरात शिफ्ट झाली होती. अशाही चर्चा होत्या. त्यामुळं या दोघांच्या नात्यासंदर्भात पोसिल चौकशी करत आहेत. रियानं देखील पोलिसांनी सहकार्य करत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली असून गरज वाटल्यास संबंधित विभागाचे डीसीपी सुद्धा रियाची चौकशी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य सरकारनंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. 'सुशांतच्या शवविच्छेदन अहवालातून त्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मात्र, मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाचा वेगळा पैलू समोर येतोय. सिनेसृष्टीतील व्यावसायिक शत्रुत्वातून त्यानं आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. त्या अनुषंगानंही पोलीस या प्रकरणाचा तपास करतील,' असं गृहमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांनीही त्यांची चौकशी सुरू ठेवली आहे. यादरम्यान, रिया आणि सुशांतचा ब्रोकर सनीचा जबाब समोर आला आहे. सनी म्हणाला की, 'सुशांतसिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती दोघं एकत्र घर शोधत होते. हे घरही दोघांनी एकत्रच घेतलं असेल. भाड्यावरून सुशांतची कधीच कोणती तक्रार आली नाही. पण रात्रभर चालणाऱ्या पार्टीवरून त्याला अनेक नोटीस पाठवण्यात आल्या होत्या.' सनीनं सांगितलं की, रियाला तो फारआधीपासून ओळखतो. अनेकदा ते भेटले आहेत. सुशांतला फ्लॅट दाखवण्याच्या निमित्ताने दोघं एक- दोन वेळाच भेटले आहेत. रिया आणि सुशांत लग्न करणार असल्याचं त्याला सांगितलं होतं. याचसाठी दोघं वांद्रे इथं घर पाहत होते. मीडिया रिपोर्टनुसार, रिया सुशांतच्या घरीच राहत होती. मात्र काही दिवसांपूर्वी ती स्वतःच्या घरी रहायला गेली. सुशांतच्या अंत्यसंस्कारांवेळीही रिया त्याच्या कुटुंबियांसोबत होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2N6BImY