Full Width(True/False)

आत्महत्या की हत्या? सुशांतच्या आयुष्यावर येणार वेब सीरिज

मुंबई: अभिनेता याच्या आत्महत्येचा धक्का बॉलिवूड आणि त्याच्या चाहत्यांना अद्याप पचवता आलेला नाही. सुशांतच्या मेहुण्यानं या घटनेमध्ये काहीतरी काळंबेरं असल्याचं म्हटलं आहे. सुशांतच्या मामानंही सुशांतनं आत्महत्या केली नसल्याचं सांगितलं आहे. शवविच्छेदन अहवालात गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचं कारण सांगितलं गेलं असलं, तरी पोलिस अधिक तपास करत आहेत. त्याच्या अकाली जाण्यामागे एखादा कट असल्याची शक्यता वर्तवली जातेय. सुशांतचा अशा प्रकारे झालेला मृत्यू गूढ निर्माण करून गेला गेलाय. यासर्व घटनेवर आता वेब सीरिज येणार असल्याची चर्चा सुरू आहे. बॉलिवूड निर्माता सुशांतच्या आत्महत्येच्या घटनेवर आधारित एका वेब सीरिजची निर्मिती करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'Suicide or Murder?'असं या सीरिजचं नाव असून याचं पोस्टर देखील शेअर करण्यात आलं आहे. बॉलिवूडमध्ये काही प्रोडक्शन हाऊस आणि मोठ्या कलाकारांची मक्तेदारी असून ही मोडून काढण्यासाठी या सीरिजची निर्मिती करत असल्याचं विजय यांनी 'नवभारतटाइम्स डॉट कॉम'सोबत बोलताना म्हटलं आहे. कशा प्रकारे सुशांतला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. कशा प्रकारे त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला होतो. त्याला बायकॉट का करण्यात आलं होतं. त्याच्याकडून एकामागोमाग एक चित्रपट का काढून घेण्यात आले? हे सर्व या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. तसंच सिनेसृष्टीत आजही अनेकजण सुशांतनं जे सोसलं आहे त्यातून जात आहेत. माझी रिसर्च टीम अशा लोकांशी संपर्क करत असून यावर काम करत असल्याचंही विजय म्हणाले. दरम्यान, सुशांतनं आत्महत्येचं इतकं टोकाचं पाऊल का उचललं या संदर्भात पोलीस आता तपास करणार आहेत. खरंच बॉलिवूडमधील स्पर्धेमुळं तो डिप्रेशनमध्ये गेला होता का? याची चौकशी केली जाईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखं यांनी म्हटलं आहे. सुशांतच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्याने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं होतं. याशिवाय तो क्लिनिकल डिप्रेशनमध्ये होता असंही त्या अहवालात म्हटलं आहे. याची दखल घेऊन गृहमंत्र्यांनी बॉलिवूडमधील स्पर्धा हेच याचे कारण आहे? का याची चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिस या प्रकरणाचा छडा लावतील असंही त्यांनी म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fyfA15