Full Width(True/False)

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा!

मुंबई: अभिनेता यानं केल्यानंतर आता त्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यानंच झाला असल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी पोलिसांनीही त्यांचा तपास आणि चौकशी सुरू ठेवली आहे. या प्रकरणी आता आणखी एक महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुशांतच्या कपाटात एक हिरव्या रंगाचा कुर्ता होता. त्यानं त्याचं कापडानं गळफास घेतला होता. पण आता याच संदर्भात एक खुलासा करण्यात आलाय. तो म्हणजे सुशांतनं आणखी एका पट्ट्याच्या साहाय्यानं गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. सुशांतनं ज्या बेडरुममध्ये आत्महत्या केली त्या बेडरुममध्ये पोलिसांना त्याच्या बाथ रोबचे काही तुकडे मिळाले आहेत. सुशांतनं बाथ रोबच्या बेल्टच्या साहाय्यानं गळफास लावण्याचा प्रयत्न केला होता. पण तो बाथरोबचा बेल्ट तुटला. त्यामुळं त्यानं कपाटातून त्याचा हिरव्या रंगाचा कुर्ता काढला आणि त्याच्या मदतीनं गळफास लावून घेतला. असा खुलासा पोलिसांनी केला आहे. पोलिस जेव्हा सुशांतच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या बहिणीनं आणि मित्रानं त्याचा मृतदेह खाली उतरवला होता. असंही पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान,सुशांतसिंहचा अखेरचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार सुशांतनं आत्महत्या केली असून त्याची हत्या झालेली नाही. सुशांतचा हा अखेरचा शवविच्छेदनाचा अहवाल पाच डॉक्टरांच्या टीमनं तयार केला आहे. अहवालानुसार सुशांतचा मृत्यू गळफास लावल्यानंतर श्वास गुदमरून झाला, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार चा तिसरा रिपोर्ट येणं अजून बाकी आहे. मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र फॉरेन्सिंग विभागाला ही चाचणी लवकरात लवकर करावी असं सांगितलं आहे. शवविच्छेदनाचा अहवाल येण्यापूर्वी सुशांतची हत्या केल्याच्या संशयावरून कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तसेच सुशांतच्या आत्महत्येमागच्या प्रत्येक अँगलचाही शोध घेणार आहे. सुशांतनं करण्यापूर्वी काही ट्विट डिलिट्स केल्याचं सांगण्यात येतं. त्या ट्विटसमध्ये त्याने नेमकं काय लिहिलं होतं? किंवा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? या ट्विट्समध्ये कुणावर आरोप तर केले नव्हते ना? किंवा या ट्विटसमधून आत्महत्येचे संकेत तर दिले नव्हते ना? या सर्व प्रश्नांचा शोध घेण्यासाठी पोलीस या ट्विटसचा तपास करणार आहे. त्यासाठी ट्विटर इंडियाशी पोलीस संपर्क साधणार आहेत. या डिलिट करण्यात आलेल्या ट्विटमधून कदाचित त्याच्या आत्महत्या प्रकरणावर प्रकाश पडू शकतो, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. सुशांतने २७ डिसेंबर २०१९ रोजी शेवटचं ट्विट केलं होतं. आतापर्यंत घेतले २३ लोकांचे जबाब सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या मित्र- परिवार, मॅनेजर, टीम मेंबर, घरात काम करणारे कर्मचारी आणि कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीसह अनेकांचे जबाब घेतले आहेत. यशराज फिल्म्सकडून सुशांतची कॉन्ट्रॅक्ट कॉपीही घेतली जी २०१२ मध्ये सुशांतने साइन केली होती. सुशांतच्या डॉक्टरांचा जबाब अजून आलेला नाही. सुशांतच्या सीएचीही चौकशी यावेळी करण्यात आली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dHR6Rr