Full Width(True/False)

सुशांत स्वखर्चातून विद्यार्थ्यांना नासाच्या वर्कशॉपसाठी पाठवायचा!

मुंबई: अभिनेता अचानक निधन पावल्याच्या धक्क्यातून अद्याप सगळे सावरलेले नाहीत. परंतु, त्यानं घेतलेली ही अकाली 'एक्झिट' सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे. सुशांतच्या निधनानं कलाविश्वावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. त्यानं रंगवलेल्या विविध भूमिकांच्या माध्यमातून तो कायमस्वरूपी सर्वांच्या स्मरणात नक्कीच राहणार आहे. सोशल मीडियावर सुशांतबद्दल अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. तो एक चांगला अभिनेताच नव्हता तर पडद्यामागं देखील तो खूप चांगल्या गोष्टी काही करत होता. त्याचे अनेक फोटो त्याचे चाहते शेअर करत आहेत. 'सुशांत फॉर एज्युकेशन' या मोहिमेअंतर्गत तो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करायचा. इतकंच नाही तर त्यानं अनेक विद्यार्थ्यांना '' या अंतराळ संशोधन केंद्रातील वर्कशॉपसाठी स्वखर्चातून पाठवलं होतं. सुशांतनं त्याच्या ५० स्वप्नांची यादी देखील शेअर केली होती.त्यात त्यानं १०० मुलांना नासाच्या वर्कशॉपसाठी पाठवायचं आहे, असा उल्लेख केला होता. तो त्याचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होता. २०१७मध्ये त्यानं दोन विद्यार्थ्यांना नासाच्या वर्कशॉपसाठी पाठवलं होतं. '' यांनी ट्विट करत सुशांतचे आभार मानले होते. हे ट्विट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनयाशिवाय, सुशांत शिक्षण क्षेत्रासाठी काही ना काही सामाजिक काम करत होता. त्याचप्रमाणे, देशातील उद्योजकता वाढीस लागावी, यासाठीही योगदान देत होता. अशा प्रकारचे काम करणारा, यशस्वी झालेला आणि इतरांच्या चांगल्या कामांमध्ये हातभार लावणारा उमदा अभिनेता नैराश्याच्या गर्तेत सापडला तरी कसा, असा प्रश्न सगळे विचारत आहेत. ग्रह-ताऱ्यांमध्ये रममाण राष्ट्रीय स्तराचा भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये विजेता ठरलेल्या सुशांतला भौतिकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात विशेष रस होता. अ‍ॅस्ट्रोफिजिक्स आणि न्युरोबायोलॉजीसारख्या विषयांबद्दलची त्यांची आवड; याबद्दल यापूर्वी 'टाइम्स' बोलताना तो म्हणाला होता की, 'मला अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये खूप रस आहे. माझ्याकडे दुर्बिणीसुद्धा आहेत. मी त्यातून आकाशाचे निरीक्षण करत असतो. या व्यतिरिक्त मला न्युरोबायोलॉजीमध्ये देखील खूप रस आहे.' सुशांतच्या बकेट लिस्टमध्ये त्याने चंद्र, मंगळ, बृहस्पती, शनि आदींच्या हालचालींचे मूल्यांकन आणि अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला पॉलिनेशियन खगोलशास्त्र, वैदिक ज्योतिष आणि योगक्रियांचादेखील अभ्यास करायचा होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YGTW5j