Full Width(True/False)

तापसीनंतर रेणुका शहाणेंना बसला वीज बिलाने शॉक

मुंबई- अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सामाजिक मुद्द्यांवर त्या आपलं मत निर्भिडपणे मांडत असतात. मात्र यावेळी त्यांचं ट्वीट कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय मुद्यामुळे व्हायरल होत नाहीये तर विजेच्या बिलामुळे त्यांचं ट्वीट व्हायरल होत आहे. हे वर्ष बॉलिवूडसाठी चांगलं नसल्याचं अनेक कलाकार बोलत आहेत. या वर्षात अनेक हरहुन्नरी कलाकारांनी कायमची साथ सोडली. या सगळ्यात आता सेलिब्रिटींसमोर एक वेगळंच आव्हान आलंय. हे म्हणजे विजेचं बील... विजेच्या बिलावरून अनेक कलाकारांनी आतापर्यंत ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. यात रेणुका शहाणे यांच्याही नावाचा सहभाग झाला आहे. रेणुका शहाणे यांचं मे महिन्यातलं बिल तब्बल १८ हजार ८० रुपये एवढं आलं आहे. याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी ट्वीट करत एका महिन्यात एवढं बिल कसं येऊ शकतो असा प्रश्न अदानी इलेक्ट्रीसिटीला विचारला. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, 'प्रिय अदानी इलेक्ट्रीसिटी मला ९ मे रोजी ५ हजार ५१० रुपये एवढं विजेचं बिल आल होतं. तर जूनमध्ये मला मे आणि जून या दोन महिन्यांचं मिळून २९ हजार ७०० रुपये बिल आलं. यात तुम्ही मे महिन्यासाठी जवळपास १८ हजार ८० रुपयांचं बिल लावलं आहे. ५ हजार ५१० रुपयांवरून हे बिल १८ हजार ८० कसं झालं?' यावेळी रेणुका यांनी बिलाचे स्क्रीनशॉटही शेअर केला. यात पहिल्यांदा मे महिन्याच्या विजेच्या बिलाचा मेसेज ५ हजार ५१० रुपयांचा आला होता. तर हातात बिल आल्यावर ती रक्क १८ हजार ८० रुपये झाली. सध्या रेणुका यांचं हे ट्वीट चर्चेचा विषय ठरलं आहे. रेणुका शहाणे यांच्याआधी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूही घरच्या विजेच्या बिलामुळे चिंतेत आहे. रेणुका यांच्याप्रमाणेच तापसीलाही अदानी इलेक्ट्रीसिटीचं या महिन्यात ३६ हजारांचं आहे. विशेष म्हणजे ज्या घरात तापसी राहत नाही त्या बंद घराचं बिल ३६ हजार रुपये आलं आहे. तापसीने याबद्दल ट्वीट करत म्हटलं की, 'तीन महिन्यांपासून देशात लॉकडाउन आहे. या काळात घरातल्या कोणत्याच उपकरणाचा जास्त वापर करण्यात आला नाही. तसंच नवीन उपकरणही घेतलं गेलं नाही. असं असतानाही ३६ हजार रुपये बिल कसं आलं. तुम्ही कशाप्रकारे बिल तयार करता?' याशिवाय तापसीने अजून एक ट्वीट करत म्हटलं की, 'या घरात कोणी राहतही नाही तरी या घराचं बिल ८ हजार ६४० रुपये आलं आहे. हे घर आठवड्यातून एकदा फक्त साफसफाईसाठी उघडलं जातं.' फक्त रेणुका आणि तापसीचा विजाच्या बिलाने पारा चढला नाही तर अभिनेत्री कार्तिका नायरलाही जून महिन्यात जवळपास लाखभर रुपयांचं विज बिल आलं आहे. कोणता घोटाळा होत आहे का असा प्रश्नही तिने ट्विटरवर विचारला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dBmaT6