Full Width(True/False)

'सेल्समन ऑफ द ईयर' ठरलेला तरुण आहे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता

मुंबई: फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका भाजी विक्रेत्याचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही म्हणाल त्यात काय इतकं विशेष आहे...पण हा भाजी विक्रेता आणि त्याची भाजी विकण्याची स्टाइल इतरांपेक्षा वेगळीच नाही तर भन्नाट देखील आहे. १४ रुपयाला कोथिंबीर विकणारा हा विक्रेता खूपच चर्चेत आलाय. लाल रंगाचा शर्ट परिधान केलेला हा तरुण दोन्ही हातात कोथिंबिरीच्या जुड्या घेऊन गाणं गात आणि हटके डान्स करत पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात भाजी विकत होता. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, त्याला आता ‘’म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे हा भाजी विक्रेता एक मराठी अभिनेता आहे. त्याचं नाव आहे . लॉकडाउनमुळं अनेकांची आर्थिक गणितं कोलमडली. मनोरंजनसृष्टीतही अनेक तरुण कलाकारांच्या हातचं काम गेलं. शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठी या कलाकारांनी दूधविक्री, मासेविक्री, कांदे-बटाट्यांची विक्री करण्याची वेळ आली आहे. पण या परिस्थितीला हार न मानता ही सर्व तरुण कलाकार मंडळी जिद्दीनं तोंड देत आहेत. रोशन देखील अभिनेता असून देखील लॉकडाउनच्या काळात भाजी विकतोय. 'माझ्यातली कला लॉकडाउनमुळं वाया जाऊ नये असं वाटतं. सध्या मला पैशांची गरज आहे. त्यामुळं जे शक्य आहे ते मी सगळं करून पाहतोय. माझ्यात अभिनय करण्याती कला आहे. याच कलेचा वापर मी भाजी विकण्यासाठी केला. बाजारातील प्रचंड गर्दी होतेय. त्यामुळं आता मी घरोघरी जाऊन भाजी विकण्याचा निर्णय घेतला आहे', असं रोशल म्हणतो. रोशन 'रघु ३५०' या चित्रपटात दिसणार आहे. परंतु लॉकडाउनमुळं या चित्रपटाचं शूटिंग लांबणीवर पडलं आहे. तर यापूर्वी त्यानं 'अनोळखी प्रीत' चित्रपटात काम केलं आहे. परंतु काही कारणांमुळं हा देखील चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाहीए. दरम्यान, महादेव तेवरे आणि निखिल महादेव तेवरे ही बाप-लेकाची जोडी ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून मनोरंजनसृष्टीत काम करते. परंतु, आता घर चालवण्यासाठी निखिल चहा विकण्याचं काम करतोय. तो सांगतो, 'सध्या काही प्रमाणात अनलॉकला सुरुवात झाल्यामुळे मी चहा विकायला सुरुवात केली आहे. दिवसाला पन्नास- साठ कप चहा विकला जातो. त्यातून मिळणाऱ्या पैशांतूनच आमचं घर चालतं. मी आणि माझे वडील आम्ही ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करतो. परंतु, आता ते काम पुन्हा मिळेल का? ते माहीत नाही. आम्ही अनेक कार्यकारी निर्मात्यांना कामासाठी फोन केला. परंतु, कोणाकडूनही उत्तर आलेलं नाही. घर चालवण्यासाठी काहीतरी काम करणं आवश्यक असल्यानं मी चहावाला झालो. माझा भाऊ छत्री विकण्याचं काम करतोय.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3i9w9T3