Full Width(True/False)

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा पार पडला साखरपुडा

मुंबई: अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शर्मिष्ठानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत चाहत्यांना साखरपुड्याची माहिती दिली.चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. असं शर्मिष्ठाच्या जोडीदाराचं नाव आहे. नाशिकमधल्या इगतपुरी इथं एका रिसॉर्टच्या क्लबहाऊसमध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा साखरपुड्याचा सोहळा पार पडला. सध्या करोनाच्या पार्श्वभीवर योग्य ती सर्व खबरदारी या सोहळ्यादरम्यान घेण्यात आली होती. सोहळ्यात आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी मास्क आणि सॅनिटायरची व्यवस्था करण्यात आली होती. अशा प्रकारे लॉकडाऊनच्या सर्व नियमांचं पालन करत शर्मिष्ठा आणि तेजस यांच्या साखरपुड्याचा सोहळा पार पडला. दोघांचे कुटुंबीय आणि मित्र-मंडळी मिळून जेमतेम ३५ जणांची उपस्थिती या सोहळ्याला होती. शर्मिष्ठा आणि तेजस जानेवारी महिन्यापासूनच सारखपुड्याचं प्लॅनिंग करत होते. एप्रिल महिन्यात साखरपुडा करण्याचं ठरलं होतं. परंतु अचानक लॉकडाउन घोषित झाल्यामुळं साखपुडा नंतर करण्याचं ठरलं होतं. आता लॉकडाउनचे नियम काही प्रमाणात शिथील केल्यानं शर्मिष्ठा आणि तेजस यांनी २१ जून रोजी साखपुडा करण्याचा निर्णय घेतला. लग्न कधी? शर्मिष्ठा आणि तेजस येत्या ऑक्टोबर महिन्यात लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु लग्नाची तारीख अद्यापही निश्चित झाली नसल्याचं समजतं आहे. शर्मिष्ठानं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं असून बिग बॉसमुळं ती चर्चेत आली होती. 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेतून ती सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकांसोबतच रंगभूमीवर देखील तिनं काम केलं आहे. 'जो भी होगा देखा जयेगा', 'टॉम अँड जेरी', 'बायको असून शेजारी', 'शंभू राजे' या नाटकात शर्मिष्ठानं काम केलं आहे.दे धक्का, फक्त लढ म्हणा, ची व ची सौ कां , काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा या मराठी चित्रपटात देखील ती झळकली आहे. वाचा: 'जुळून येती रेेशीम गाठी' या मालिकेतही शर्मिष्ठानं महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिनं काही काळासाठी ब्रेक घेतला होता .'दोन वर्षानंतर नव्या उत्साहानं छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. टीव्हीमुळे आम्ही कलाकार घराघरात पोहोचतो. त्यामुळे छोटा पडदा माझ्यासाठी खास आहे. बिग बॉसमुळे प्रेक्षकांनी माणूस म्हणून मी कशी आहे हे बघितलं आणि आता पुन्हा एकदा कलाकार म्हणून मी प्रेक्षकांसमोर येतेय. ही नवी भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी आशा करते', असं शर्मिष्ठा म्हणाली होती. वाचा:


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dnC2Z9