मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबियांनी पटणामधील घरी शोकसभा आयोजित केली. या शोकसभेला जवळचे नातेवाईक आणि आप्तेष्ट आले होते. नातेवाईकांसोबत सिनेसृष्टीतील लोक, नेते आणि अन्य सेलिब्रिटींनी शोकसभेला उपस्थिती लावली. सध्या सोशल मीडियावर सुशांतच्या घरचे शोकसभेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. भोजपुरी कलाकारांसोबत बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोरी, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद या नेत्यांनीही सुशांतच्या वडिलांची शोकसभेला भेट घेतली. सुशांतचं जाणं हे राजपूत कुटुंबियांचं कधीही न भरून येणारं नुकसान आहे. सुशांतसिंह राजपूतने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. गेल्या काही महिन्यांपासून तो नैराश्यात असल्याचं म्हटलं जात होतं. नैराश्यावर तो उपचारही घेत होता. सुशांतच्या कुटुंबियांनी यासंबंधी सीबीआयकडे चौकशी व्हावी अशी मागणी केली. मुंबई पोलिसांनीही याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तीन वेगवेगळ्या टीम तयार केल्या आहेत. आतापर्यंत सुशांतच्या आत्महत्येशी निगडीत अनेकांचे जबाब मुंबई पोलिसांनी घेतले. सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीचीही पोलिसांनी सहा तासांहून अधिक तास चौकशी केली. याशिवाय बिहारमध्ये आतापर्यंत अनेक बड्या स्टारविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. शनिवारी मुजफ्फरपूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीने एका षडयंत्रांतर्गत सुशांतसिंग राजपूतला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि अनेक फायदेही मिळवून घेतल्याचा आरोप कुंदन कुमार यांनी केला. या आरोपात असेही म्हटले आहे की सुशांतने मनापासून हे नातं जपलं होतं पण रिया मात्र सुशांतचा फक्त वापर करत होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या प्रकरणी सुशांतची जवळची मैत्रीण चा जबाब नोंदवण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून रिया आणि सुशांत एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळं रियाची चौकशी आणि तिनं नोंदवलेला जबाब महत्त्वाचा ठरणार आहे. पोलिसांनी रियाची तब्बल सहा तास चौकशी केली. या चौकशीत तिनं अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यांच्या नात्याबद्दलही अनेक गोष्टी तिनं पोलिसांना सांगितल्या. सुशांतनेच रियाला निघून तू इथून निघून जा असं सांगितलं होतं; असंही तिनं पोलिसांना सांगितलं. त्यामुळं ती ६ जून रोजी सुशांतच्या वांद्र्यातल्या घरातून निघून गेली होती. सुशांत काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते. पण त्यानं काही दिवसांपूर्वी औषध घेणं बंद केलं होतं. तो अनेकदा त्याच्या रुममध्ये स्वत:ला बंद करुन घ्यायचा आणि रडायचा; असंही रिया म्हणाली. ६ जून रोजी काही कारणांवरून त्या दोघांमध्ये भांडण झालं होतं त्यामुळं ती तिथून निघून गेली असं रियानं म्हटलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2CvlW35