मुंबई- प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या गाडीला दुसऱ्या एका गाडीने बुधवारी रात्री धडक मारली. त्यावेळी गाडीत गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहूजा आणि चालक होते. असं म्हटलं जातंय की ही दुसरी गाडी बॅनरशी निगडीत एका व्यक्तीची होती. साधारणपण रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. जुहू पोलिसांच्या सांगण्यानूसार याप्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नाही. दोघांनीही आपसात हे प्रकरण सोडवलं. ज्या गाडीने धडक दिली ती गाडी चालक चालवत होता. दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले नाही. या धडकेत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. 'रंगीला राजा'मध्ये दिसला गोविंदा गोविंदाच्या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर २०१९ मध्ये त्याचा 'रंगीला राजा' सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण हा सिनेमा फारसा चालला नाही. ५६ वर्षीय गोविंदाला टीना आणि यशवर्धन ही दोन मुलं आहेत. टीनाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. आता यशही वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत यायला सज्ज झाला आहे. यशने लंडनहून फिल्ममेकिंगचा कोर्स केला. यानंतर त्याने दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाच्या मार्केटिंग टीममध्येही काम केलं. असं म्हटलं जातं की, सलमान खानच्या 'किक' सिनेमाच्या सीक्वलमधून तो सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. पण करोना व्हायरसमुळे हा प्रोजेक्ट आता थांबला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fWReOO