Full Width(True/False)

काश... तुम्ही दोघांनी लग्न केलं असतं; सुशांत आणि अंकिताच्या मित्राची भावुक पोस्ट

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत यानं या जगातून घेतलेल्या अकाली एक्झिटमुळं अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्याचे मित्र आणि कुटुंबिय या धक्क्यातून अद्यापही सावरले नाही. सुशांतच्या जवळच्या काही मित्र मंडळींना सोशल मीडियावर भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. निर्माता आणि दिग्दर्शक संदीप सिंग यानं लिहिलेली इन्स्टाग्राम पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. संदिप हा सुशांत आणि अंकिताचा चांगला मित्र आहे. पवित्र रिश्ता मालिका सुरू होती तेव्हा हे तिघंही एकत्र राहत होते. त्या आठवणी देखील संदीपनं त्याच्या पोस्टमध्ये शेअर केल्या आहेत. संदीपनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की.... 'प्रिय, अंकिता...जसे दिवस सरतायत तसा माझ्या डोक्यात एकच विचार येतोय की, काश... आपण त्याला हे करण्यापासून वाचवू शकलो असतो. यातून बाहेर काढू शकलो असतो. तुम्ही दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला होता. पण तू नेहमची त्याच्या आनंदासाठी आणि चांगल्यासाठी प्रार्थना केलीस. तुझं प्रेम खरं होतं. अजूनही तू तुझ्या घराच्या नेमप्लेटवरून सुशांतचं नाव काढलं नाहीस. आपण तिघं जेव्हा लोखंडवालामध्ये एकत्र राहायचो...ते दिवस मला आठवताय. एकत्र जेवण बनवणं, खाणं ...घरातल्या एसीमधून पाणी टपकनं...आणि आपला स्पेशल मटण भात. लॉन्ग ड्राइव्हला जाणं...आपली अतरंगी होळी..आपलं ते हसणं आणि एकमेकांच्या अवघड काळात दिलेली साथ. सुशांतच्या चेहऱ्यावर हास्य येण्यासाठी तू केलेली प्रत्येक गोष्ट. आजही मला असं असं वाटतं की, तुम्ही दोघं 'मेड फॉर इच ऑदर' होता. तुमच्या दोघांचही एकमेकांवर खरं प्रेम होतं. या सर्व आठवणी मला वेदना देतायत. मला या सर्व आठवणी परत हव्या आहेत... आपल्या तिघांचं ते जग पुन्हा हवं आहे. मला माहित आहे , फक्त तूच त्याला वाचवू शकली असती. काश...आपण तुमच्या लग्नाचं जे स्वप्न पाहिलं होतं ते खरं झालं असतं. तुझं त्याच्यासोबत असणंच त्याला वाचवू शकलं असतं. तू त्याची गर्लफ्रेंड होती, त्याची पत्नी, आई आणि मैत्रिणही तूच होतीस. आय लव्ह यू अंकिता. तुझ्या सारख्या मैत्रिणीला मला गमवायचं नाहीए! संदीपनं लिहिलेली ही पोस्ट वाचून चाहत्यांच्या डोळ्यातही पाणी आल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, सुशांत ज्या मनोचिकित्सक डॉक्टरांकडं उपचार घेत होता त्या केरसी चावडा यांनी त्याच्या आयुष्यातील काही गोष्टीचा खुलासा केलाय. सुशांतनं त्यांच्याशी सहा महिन्यापूर्वी संपर्क केला होता. तेव्हा एका वर्षापासून डिप्रेशनमध्ये असल्याचं सांगितलं होतं. अंकिता लोखंड सोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही दिवस सर्व ठिक होतं. पण त्यानंतर आयुष्यात आणि त्याच्या नात्यांमध्ये स्थिरपणा आला नाही. व्यावसायिक ताण आणि नात्यांमधलीअस्थिरतायांनी तो काहीसा खचला होता. असं ते म्हणाले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Che1pN