नवी दिल्लीः गुगलने अँड्रॉयड युजर्संसाी ऑफर करीत असलेले ३० प्रसिद्ध अॅप्स प्ले स्टोरवरून हटवले आहे. त्यामुळे धोकादायक मेलवेयर मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता नवीन युजर्संना या अॅप्सला प्ले स्टोरवरून डाऊनलोड करता येऊ शकणार नाही. पंरतु, हे अॅप्स २ कोटींहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. त्यामुळे युजर्संनी तात्काळ आपल्या फोनमधून हे अॅप्स डिलीड करावे असा सल्ला दिला जात आहे तसेच या यादीत सर्वात जास्त युजर्संनी थर्ड पार्टी सेल्फी अॅप्स डाऊनलोड केले असून त्यात मेलवेअर आहे, अशी माहिती समोर आली आहे. वाचाः च्या सिक्योरिटी रिसर्चर्सने या अॅप्सची माहिती उघड केली आहे. या अॅप्समध्ये खूप साऱ्या जाहिराती दाखवल्या जातात. तसेच लिंकवर क्लिक केले नाही तीर युजर्स त्याच्यावर रिडायरेक्ट जात आहेत. तसेच अनेकवेळा एकदा डाऊनलोड केल्यानंतर युजर्संना पुन्हा डाऊनलोड करण्यास भाग पाडत आहेत. तसेच या अॅप्सला डिलीट करणे सुद्धा जिकीरीचे होऊन बसते. आम्ही तुम्हाला या ठिकाणी या अॅप्सची एक यादी देत आहोत. जर यातील कोणता अॅप तुमच्या मोबाइलमध्ये असेल तर तो तात्काळ डिलीट करा. वाचाः अॅप्समध्ये लपले आहेत मेलवेअर समोर आलेल्या अॅप्सला जवळपास २ कोटी हून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. WhiteOpsकडून सांगण्यात आले आहे. या अॅप्सला खूप साऱ्या जाहिराती दाखवण्यासाठी डिझाईन केले आहे. पहिल्यांदा अॅप पब्लिश केल्यानंतर फ्रॉड करणाऱ्या जवळपास ११ व्या दिवशी नवीन अॅप पब्लिश केले. त्यामुळे जास्तीत जास्त अॅप्स प्ले स्टोरवरून हटवण्याआधी १७ दिवसांपर्यंत राहतात. या अॅप्सच्या apk मध्ये पॅकर्सचा वापर करुन त्यातील मेलवेअर्स लपवण्यात आले होते, हेही आता उघड झाले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2BnEuli