मुंबई: अभिनेता यानं आत्महत्या केली पण मागे अने प्रश्न सोडून गेला. त्यानं आत्महत्येचा निर्णय का घेतला हे अजूनपर्यंत कळू शकले नाही. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे. पोलिसांनीही त्यांची चौकशी सुरू ठेवली आहे. पोलिसांकडून त्याच्या कुटुंबियांसोबतच इतर काही जणांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र सध्या सुशांतचा सर्वात जवळचा मित्र याच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात संदीपची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नेटकऱ्यांमार्फत सोशल मीडियावर केली जात आहे. नुकत्याच एका मुलाखती दरम्यान संदीपनं काही गोष्टी सांगितल्या होत्या. या गोष्टी संशयास्पद असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी आता संदीप विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देखील करण्यात आली आहे. या मुलाखतीत संदीपनं बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा सुशांतच्या आत्महत्येशी काहीच संबंध नाही, असं म्हणत करण जोहर आणि सलमान खान यांना त्यानं क्लिन चीट दिली होती. तसंच सुशांतची आत्महत्या ही इतर आत्महत्यांप्रमाणं सामान्य आहे. त्याचं कोणतही ठोस कारण नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारे तर्क निव्वळ लोकांच्या कल्पना असल्याचंही संदीपनं म्हटलं होतं. देशभरात बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केली जात असताना संदीपनं मात्र यात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं तो त्याचं करिअर वाचण्याच्या हेतूनं हे करत असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. संदीनं दिलेल्या या मुलाखतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून संदीपच्या फोन आणि सोशल मीडिया अकाउंटचा तपास व्हावा, असंही नेटकरी म्हणतायत.सुशांतच्या कुटुंबियांचे मित्र असलेल्या नीलोत्पल मृणाल यांनी संदीपवर संशय व्यक्त केलाय.पोलिस या प्रकरणाचा तपास करत असताना संदीप अशा प्रकारची वक्तव्ये सोशल मीडियावर आणि मुलाखतीत कसा काय बोलू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान,दरम्यान,सुशांतचा अखेरचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार सुशांतनं आत्महत्या केली असून त्याची हत्या झालेली नाही. सुशांतचा हा अखेरचा शवविच्छेदनाचा अहवाल पाच डॉक्टरांच्या टीमनं तयार केला आहे. अहवालानुसार सुशांतचा मृत्यू गळफास लावल्यानंतर श्वास गुदमरून झाला, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार चा तिसरा रिपोर्ट येणं अजून बाकी आहे. मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र फॉरेन्सिंग विभागाला ही चाचणी लवकरात लवकर करावी असं सांगितलं आहे. शवविच्छेदनाचा अहवाल येण्यापूर्वी सुशांतची हत्या केल्याच्या संशयावरून कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तसंच सुशांतच्या आत्महत्येमागच्या प्रत्येक अँगलचाही शोध घेणार आहे. सुशांतनं करण्यापूर्वी काही ट्विट डिलिट्स केल्याचं सांगण्यात येतं. त्या ट्विटसमध्ये त्याने नेमकं काय लिहिलं होतं? किंवा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? या ट्विट्समध्ये कुणावर आरोप तर केले नव्हते ना? किंवा या ट्विटसमधून आत्महत्येचे संकेत तर दिले नव्हते ना? या सर्व प्रश्नांचा शोध घेण्यासाठी पोलीस या ट्विटसचा तपास करणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eKgoQf