मुंबई: देशाचं रक्षण करताना हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर जवानांविषयी प्रत्येक नागरिकाच्या मनात आदर आहे. गलवानमध्ये झालेल्या चकमकीत शहीद झालेले भारतीय जवान, पुलवामामध्ये अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले यांना देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. या पार्श्वभूमीवर, 'कलाकारांना हिरो म्हणू नका. तर लष्करी जवान आणि पोलीस यांना हिरो म्हणा', असं ज्येष्ठ अभिनेते यांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावर सध्या परेश रावल यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे. समाजातल्या विविध घटनांवर परेश रावल नेहमी व्यक्त होत असतात. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणारे जवान आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या पोलिसांप्रती त्यांनी आदरयुक्त भावना व्यक्त केल्या आहेत. 'खरं तर आपण कलाकारांना एन्टरटेनर म्हटलं पाहिजे आणि लष्करी जवान, पोलीस यांना 'हिरो' म्हटलं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला खरे 'हिरो' कोण हे समजलं पाहिजे, त्यामुळे हा बदल नक्कीच केला पाहिजे', असं ट्विट परेश रावल यांनी केलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी परेश रावल यांनी केलेलं ट्विट देखील चर्चेचा विषय ठरलं होतं. परंतु या ट्विटमुळं नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. भारतात करोनाचा संसर्ग झपाट्यानं होतं आहे. या पार्श्वभूमीवर परेश रावल यांनी वादग्रस्त ट्वीट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटमुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. परेश यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'किमान काही काळासाठी तर लोक सेल्फी घेण्याची हिंमत करणार नाहीत आणि त्रासही देणार नाहीत.' परेश यांचं हेच ट्वीट अनेकांना खटकलं आणि सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. एका युझरनं परेश रावल यांच्या ट्वीटवर रिप्लाय देताना लिहिलं होतं की, 'सर, कदाचित तुम्हाला गैरसमज झाला आहे. तुम्हाला स्टार आम्ही केलं. आता लोक तुमच्यासोबत सेल्फी घेणार नाहीत. आता देश बदलला आहे. त्यांना कळलंय की तुम्ही फेक हिरो आहात. आता सेल्फी डॉक्टर, नर्स, पोलीस आणि सफाई कामगारांसोबत घेतली जाईल.' साकारणार माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांची भूमिका भारताचे माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉक्टर यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात परेश रावल कलामांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. चतूरस्त्र अभिनय कौशल्यानं परेश रावल यांनी नायक, खलनायक, सहकलाकार अशा सर्वच भूमिका लिलया पेलल्या. आता ते कलामांची भूमिका साकारायला सज्ज झाले आहेत. स्वतः रावल यांनी ट्विटरवरून याची माहिती चाहत्यांना दिली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YthqdU