मुंबई- प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. लीलावती इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. ताप आणि अशक्तपणा आल्यामुळे त्याने इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना अशक्तपणा असल्यामुळे डॉक्टरांनी घरी सोडले नाही. पण २५ जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. अनेक संगीत नाटकांमध्ये त्यांनी कामं केली. त्यांचे संगीत सौभद्र नाटकातील राधाधर मधु मिलिंद हे नाट्यगीत विशेष गाजले. जांभेकर हे मुंबई आकाशवाणी केंद्रात दीर्घकाळ प्रोड्युसर म्हणून कार्यरत होते. काही काळ त्यांनी सांगली आकाशवाणी केंद्रातही नोकरी केली. शास्त्रीय, सुगम, नाट्य या प्रकारांमध्ये त्यांची विशेष पकड होती. शरद जांभेकरांनी लता मंगेशकरांसोबत अनेक गाण्यांमध्ये कोरस म्हणून साथही दिली होती. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका गाजल्या आहेत. शास्त्रीय संगीतामध्ये अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, सुना आणि नातवंडं असा मोठा परिवार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2BGpHSY