Full Width(True/False)

सरोज खान रुग्णालयात दाखल; करोना चाचणी निगेटिव्ह

मुंबई: हिंदी सिनेसृष्टीतील अनेक आघाडीच्या तारे-तारकांना नृत्याचे धडे देणाऱ्या प्रसिद्ध कोरिओग्राफर यांची प्रकृती खालावली आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. वाचा: 'सरोज खान यांना शनिवारी श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना जवळच्याच गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्वसनविकार असल्यास चाचणीही सध्या बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार सरोज खान यांची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे', असे खान कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले. सरोज खान यांची प्रकृती आता चांगली आहे. प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. त्यात करोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्याबाबतची चिंताही दूर झाली आहे. येत्या एक दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो, असेही सूत्रांनी पुढे नमूद केले. वाचा: दरम्यान, म्हणून सरोज खान यांचा सिनेसृष्टीत मोठा दबदबा राहीला आहे. सुमारे २ हजार गाणी त्यांनी कोरिओग्राफ केली आहेत. तीनवेळा त्यांनी उत्कृष्ट कोरिओग्राफीसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. ' देवदास ' चित्रपटातील ' ' , ' तेजाब ' मधील 'एक दोन तीन' आणि 'जब वुई मेट'मधील 'ये इश्क हाये' या गाण्यांच्या कोरिओग्राफीसाठी त्यांना हे पुरस्कार मिळाले आहेत. सरोज खान मध्ये तीन वर्षे बॉलिवूडपासून दूर होत्या. २०१९ मध्ये त्यांनी कमबॅक केले. कंगना रणौतची मध्यवर्ती भूमिका असलेल्या 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी' चित्रपटातील गाणे सरोज यांनी कोरिओग्राफ केले आहे. त्याशिवाय कलंक चित्रपटातील गाण्याची कोरिओग्राफीही सरोज यांनी केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dvFOzI