मुंबई: अभिनेता याच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. सुशांतच्या आत्महत्येला बॉलिवूडमधील घराणेशाही कारणीभूत ठरल्याचं म्हटलं जात असताना सोनमनं केलेल्या ट्विटमुळं ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. फादर्स डे निमित्तानं सोनमनं केलेल्या ट्विटला अभिनेत्री हिचा बॉयफ्रेंड यानं सडेतोड उत्तर दिल्यानं तो सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर वाद सुरू असताना सोनमनं फादर्स डे निमित्तानं पुन्हा एकदा नवीन ट्विट करत तिच्यावर टीका करणाऱ्या नेटकऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. सोनमनं तिच्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, 'फादर्स डे'निमित्तानं मला आणखी एक गोष्ट सांगायचीए. ती म्हणजे होय, मी माझ्या वडिलांची मुलगी आहे.मी आज इथं माझ्या वडिलांमुळंचं आहे. या गोष्टीचा मला अभिमान आहे. तो अपमान नाहीए. माझ्या वडिलांनी मला हे सर्व देण्यासाठी प्रचंड कष्ट केलेत. माझ्या कर्मांमुळं मी त्यांच्या घरात जन्मले. त्याचा मला अभिमान आहे' . सोनमच्या या ट्विटला रॉकीनं त्याच्या शैलीत उत्तर दिलंय. 'जर एखाद्या व्यक्तीला घराणेशाहीमुळं काम करण्याची संधी मिळाली नाही तर ती त्याच्या मागच्या जन्माची फळं असतात? यावरू मला तुमच्या पुढच्या जन्माचा विचारही करवत नाही', अस रॉकीनं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या कमेंट्स पाहून शेवटी सोनमवर आपलं कमेंट सेक्शन बंद करण्याची वेळ आली आहे.सुशांतच्या मृत्यूनंतर, गुणवान कलाकारांना सिनेसृष्टीत संधी मिळत नसल्याच्या मुद्द्यावरुन चर्चा होत आहे. त्या मुद्द्याला धरुन सोनमनं एक ट्विट केलं होतं. त्यात तिनं म्हटलं होतं, की 'कुणाच्याही मृत्यूनंतर त्याच्या गर्लफ्रेंडला, कुटुंबाला, सहकाऱ्यांना दोष देणं योग्य नाही.' त्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल केलं होतं. एका ट्विटर युजरनं म्हटलं होतं की,'हा गर्लफ्रेंड किंवा एक्स गर्लफ्रेंडचा मुद्दाच नाहीए. त्यांना कोणीही दोष देत नाहीए. खरा दोष हा बॉलिवूडमधल्या घराणेशाहीला दिला जातोय. तर एकानं 'तू अनिल कपूरची मुलगी नसतीस तर कुठं तरी घरकाम करत असतीस', असं म्हटलं होतं. शिवाय, सोनमचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागलाय, ज्यात ती करण जोहरच्या रॅपिड राऊंडमध्ये, सुशांतसिंहला ओळखत नसल्याचं म्हणतेय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुशांतसिंह हे नावच माहीत नसल्यासारखं सोनम वागताना दिसते. करणने सोनमला सुशांतचं नाव घेत हा अभिनेता हॉट आहे की नाही असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना पहिल्यांदा सोनमने Huh अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर ती बोलते की, '...म्हणजे मी त्याचे सिनेमे पाहिले नाहीत त्यामुळे मला माहित नाही.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2BsjAkV