नवी दिल्लीः जर तुम्ही अनेक दिवसांपासून एक जबरदस्त फोन खरेदीचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी ही एक खास संधी आहे. फ्लिपकार्टवर २३ ते २७ जून दरम्यान Big Savings Days सेल आयोजित करण्यात आला आहे. या सेलमध्ये सर्व कंपन्यांच प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर २० हजार रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट आणि टॉप डिल्स मध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी हा सेल आज रात्री म्हणजेच २२ जून रोजी रात्री ८ वाजेपासून सुरु होणार आहे. वाचाः १० टक्के एक्स्ट्रा डिस्काउंटचा फायदा या सेलमध्ये फ्लॅट डिस्काऊंट सोबत अनेक अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे. जर या सेलमध्ये एचडीएफसी बँक किंवा डेबिट कार्डवरून शॉपिंग केल्यास ग्राहकांना १० तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी A80 या सेलमध्ये या फोनवर २० हजार रुपयांपर्यंत बंपर सूट दिली जात आहे. या सूटनंतर या फोनची किंमत ४१ हजार ९९९ रुपयांवरून २१ हजार ९९९ रुपये झाली आहे. फोन खास रोटेटिंग कॅमेरा सेटअप सोबत येतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा लेन्स आणि एक टाइम ऑफ फ्लाईट डेप्थ सेन्सर दिला आहे. वाचाः iQOO 3 हा जबरदस्त गेमिंग फोन या सेलमध्ये ३२ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकतो. या फोनची किंमत ३४ हजार ९९० रुपये आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. तसेच ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये 4440mAh बॅटरी दिली आहे. ५५ वॅटची फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. रियलमी X2 प्रो ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. या सेलमध्ये हा फोन २५ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4000mAh बॅटरी दिली आहे. जी ५० वॅट फास्ट चार्जिंगसोबत येते. वाचाः रेडमी K20 प्रो या सेलमध्ये या फोनला २६ हजार ९९९ रुपयाऐवजी २३ हजार ४९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन रेडमीचा एक फ्लॅगशीप हँडसेट आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. २० मेगापिक्सलचा पॉप अल सेल्फी कॅमेरी दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4000mAh ची बॅटरी दिली आहे. पोको X2 या सेलमध्ये हा फोन सूट मिळाल्यानंतर १७ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेटअप सोबत स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये २७ वॅट चार्जिंग सपोर्ट सोबत 4500mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YoHC9v