Full Width(True/False)

ख्रिश्चन असूनही विजयने हिंदू पद्धतीने केलं लग्न

चेन्नई- दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा चंद्रशेखर आज २२ जून रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. विजयचं पूर्ण नाव आहे . पण त्याचे चाहते त्याला विजय नावानेच ओळखतात. सुपरहिट अभिनेत्यांमध्ये विजयचं नाव आवर्जुन घेतलं जातं. विजयने त्याच्या करिअरमध्ये एकाहून एक हिट सिनेमे दिले आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल फारशा माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत. विजयने सिनेसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण केलं होतं. मात्र मुख्य अभिनेता म्हणून १९९२ मध्ये आलेला 'नालया थीरपू' हा त्याचा पहिला सिनेमा होता. यावेळी विजय फक्त १८ वर्षांचा होता. यानंतर त्याने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं. फार कमी लोकांना माहीत आहे की, बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने विजयच्या सिनेमातूनच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. २००२ मध्ये आलेला प्रियांका आणि विजयचा thamizhan हा पहिला सिनेमा होता. एवढंच नाही तर विजयने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबतही काम केलं आहे. सिनेकरिअरमध्ये विजयने अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर विजयने कोणत्या अभिनेत्रीसोबत नाही तर सामान्य मुलीशी लग्न केलं. विजयच्या पत्नीचं नाव संगीता आहे. विजय आि संगीता दोन मुलांचे पालक आहेत. संगीता आणि विजयची प्रेमकथाही फार रंजक आहे. संगीता यूकेमध्ये राहत होती आणि ती विजयची फार मोठी चाहती होती. एकदा चित्रीकरणाच्या सेटवरच ती विजयला भेटली होती. यानंतर दोघांमध्ये गप्पा- गोष्टी होऊ लागल्या आणि दोघं एकमेकांना पसंत करू लागले. एक दिवस विजयच्या वडिलांना संगीताला घरी बोलावून तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. संगीतानेही लग्नाला होकार दिला. यानंतर २५ ऑगस्ट १९९९ मध्ये विजय आणि संगीताने लग्न केलं. विजय ख्रिश्चन आहे तर संगीता हिंदू. पण दोघांच्या प्रेमात कधीही धर्म आला नाही. विजयने संगीताशी हिंदू पद्धतीने लग्न करण्याचा तेव्हा निर्णय घेतला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2NjbhdN