Full Width(True/False)

सुशांतच्या शरीरात विष नाहीच; अंतिम व्हिसेरा रिपोर्ट सीबीआयच्या हाती

मुंबई:दिवंगत बॉलिवूड अभिनेता याच्या शवविच्छेदन अहवालाचा () तपास पूर्ण झाला असून एम्सच्या डॉक्टरांनी याचा अहवाल सीबीआयला सादर केला आहे. सुशांतचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे आता समोर येण्याची शक्यता आहे. सुशांतला विष देण्यात आलं होतं का? याचं उत्तर या अहवालात मिळालं असलं तरी अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. सीबीआयनं एम्सच्या डॉक्टरांचे पथक तयार केलं आहे .या पथकात एम्सच्या चार डॉक्टरांचा समावेश असून डॉक्टरांच्या या पथकाचं नेतृत्व डॉ.सुधीर गुप्ता करत केलंय. डॉक्टरांच्या या टीमने सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकराचं विष किंवा विषारी पदार्थ आढळला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एम्सच्या डॉक्टरांच्या टीमकडून सुशांतचा ऑटोप्सी, व्हिसेराचा फॉरेन्सिक अवहवाल सीबीआयकडे सादर केलाय. सुशांतच्या मृत्यूनंतर कूपर रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं होतं. कूपर रुग्णालय तसंच कूपर रुग्णालयतील डॉक्टरांवरही संयश व्यक्त केला जात होता. त्यामुळं सीबीआयनं तपास हाती घेतल्यानंतर कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या शवविच्छेदनाची फेरतपासणी केली. सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट एम्सच्या डॉक्टरांकडून पुन्हा तपासण्यात आलाय. याचा अवहवाल सीबीआयकडे सादर करण्यात आला असला तरी कूपर रुग्णालयाला क्लिन चीट देण्यात आली नसल्याचं एम्सच्या डॉक्टरांनी म्हटलं आहे. सीबीआयनं केलं स्पष्ट दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबीयांच्या वकिलांनी सीबीआयवर आरोप केला होता. सुशांतची गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि सीबीआयकडून चौकशीत दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप वकिलांनी केला होता. यावर सीबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे. अद्याप कोणत्याही गोष्टीचा इन्कार करण्यात आलेला नाही, असं सीबीआयनं निवेदन जारी करत म्हटलं आहे. 'सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या प्रकरणाची पूर्ण व्यावसायिक दृष्टीने चौकशी करत आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक बाबींकडे पाहिलं जात आहे आणि कोणत्याही गोष्टीचा इन्कार करण्यात आलेला नाही. या प्रकरणाची तपासणी सुरू आहे.', असं सीबीआयनं स्पष्ट केलं आहे. १४ जून रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील घरी गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला होता. घटनास्थळी चिठ्ठी अथवा इतर काही लिखित स्वरूपात न मिळाल्याने त्याच्या मृत्यूबद्दल त्याच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केलाय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2GbLOmL