मुंबई- सुशांतसिंह राजपूतने १४ जूनला त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सध्या मुंबई पोलीस या घटनेची चौकशी करत असून याच्याशी निगडीत नवनवीन माहिती समोर येत आहे. सुशांतने आत्महत्या करण्याच्या तीन दिवसआधी सर्व कर्मचाऱ्यांचे पगार दिले होते. पुढे पगार देणं शक्य नाही- सुशांतने आत्महत्या का केली याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या मित्रांची आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. रिपोर्टनुसार, सुशांतने आत्महत्या करण्याच्या तीन दिवसआधी सर्व कर्मचाऱ्यांचे पगार दिले होते. यासोबतच त्याने पुढील पगार देणं शक्य होणार नाही असंही सांगितलं होतं. वेबसीरिजसाठी दिशाच्या होता संपर्कात- याशिवाय एक्स- मॅनेजर दिशासोबत तो एका वेबसीरिजमधील भूमिकेसंदर्भात संपर्कात होता. पण याचा थेट संबंध त्याच्या आत्महत्येशी नसल्याचं समोर आलं. दोघंही मार्च महिन्यात व्हॉट्सअपवर शेवटचे बोलले होते. या सिनेमांसाठी लक्षात राहील सुशांतसिंह राजपूत २०१९ मध्ये सुशांतचा 'छिछोरे' सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात त्याच्यासोबत श्रद्धा कपूरचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. 'काय पो छे', 'एमएस धोनी', 'केदारनाथ' या सिनोमांसाठी त्याला नेहमी लक्षात ठेवलं जाईल. दरम्यान, सुशांतनं आत्महत्येचं इतकं टोकाचं पाऊल का उचललं या संदर्भात पोलीस आता तपास करणार आहेत. खरंच बॉलिवूडमधील स्पर्धेमुळं तो डिप्रेशनमध्ये गेला होता का? याची चौकशी केली जाईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखं यांनी म्हटलं आहे. सुशांतच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्याने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं होतं. याशिवाय तो क्लिनिकल डिप्रेशनमध्ये होता असंही त्या अहवालात म्हटलं आहे. याची दखल घेऊन गृहमंत्र्यांनी बॉलिवूडमधील स्पर्धा हेच याचे कारण आहे? का याची चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिस या प्रकरणाचा छडा लावतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37MAUx5