मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. दरम्यान, अभिनेता विवेक ओबेरॉयने ट्विटरवर भावुक पोस्ट शेअर केली आहे. सुशांतने आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता त्याच्याशी एकदा बोलायला हवं होतं. विवेकने त्याचा अनुभव नक्की सांगितला असता, असंही ट्वीटमध्ये सांगितलं. सुशांतच्या वडिलांकडे पाहवतही नव्हतं- सुशांतसिंह राजपूतच्या अंत्यसंस्कारानंतर विवेकने ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, 'सुशांतच्या अंत्यसंस्काराला जाणं हे हृदय पिळवटून टाकणारं होतं. मी माझ्या आयुष्याचा अनुभव त्याला सांगू शकलो असतो आणि त्याचं दुःख कमी करू शकलो असतो. मला त्याच्या दुःखाची जाणीव आहे. मीही यातून गेलो आहे. यात तुम्हाला एकटेपणा वाटतो. पण मृत्यू हा काही उपाय नाही. आत्महत्या कोणत्याही गोष्टीवर उपाय नाही.' 'त्याने थांबून आपलं कुटुंब, मित्र आणि कोट्यवधी चाहत्यांबद्दल विचार केला असता तर.. त्याला जाणीव झाली असती की त्याची काळजी करणारे अनेकजण त्याने मागे सोडले आहेत. जेव्हा मी त्याच्या वडिलांना चितेला अग्नी देताना पाहिलं, त्यांच्या डोळ्यांमधलं दुःख सहन करण्यापलिकडचं होतं. जेव्हा त्याच्या बहिणींना रडताना पाहिलं.. त्या सुशांतला परत येण्यासाठी भीक मागत होत्या. ते सर्व पाहताना मला किती वेदना झाल्या हे मी शब्दात सांगू नाही.' आता तरी सिनेसृष्टी आत्मपरीक्षण करेल अशी आशा व्यक्त करतो विवेकने पुढे लिहिले की, 'बॉलिवूड सिनेसृष्टी जी स्वतःला एक कुटुंब मानते ती आता आत्मपरीक्षण करेल. चांगूलपणासाठी आपल्याला बदलावं लागेल. व्यर्थ बडबड कमी आणि काळजी जास्त घ्यावी लागेल. पॉवर प्ले कमी आणि मोठं मन दाखवावं लागेल. अहंकार कमी आणि योग्य टॅलेन्टला ओळख दिली पाहिजे. या कुटुंबाला खऱ्या अर्थाने कुटुंब होण्याची गरज आहे. सदैव हसणाऱ्या सुशांत मला नेहमी आठवेल. देव तुझं सारं दुःख घेवो जे तू सहन केलं आणि तुझ्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची हिंमत मिळो. आशा करतो की तू चांगल्या जागी गेला असशील. आम्ही लोक तुझ्या योग्यतेचे नव्हतो.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37yWZ1X