मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या निधनाचा साऱ्यांनाच धक्का बसला होता. या दरम्यान घराणेशाहीवर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. यात करण जोहरचा शोमधील जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात अनिल कपूर आणि सोनम कपूर दोघंही या शोमध्ये आले होते. या शोमध्ये अनेकदा सेलिब्रिटींनी सुशांतची थट्टा उडवल्याचं समोर आलं आहे. आलिया भट्ट असो की सोनम कपूर साऱ्यांनीच सुशांतची खिल्ली उडवली असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. सुशांतचे सिनेमे पाहत नाही- व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुशांतसिंह हे नावच माहीत नसल्यासारखं सोनम वागताना दिसते. करणने सोनमला सुशांतचं नाव घेत हा अभिनेता हॉट आहे की नाही असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना पहिल्यांदा सोनमने Huh अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर ती बोलते की, '...म्हणजे मी त्याचे सिनेमे पाहिले नाहीत त्यामुळे मला माहीत नाही.' वाईट आहे शो- सध्या ट्विटरवर करण आणि सोनमवर अनेकजण आगपाखड करत आहेत. तसेच बॉलिवूडमधील घराणेशाहीला करणला जबाबदार मानत आहेत. सुशांतसोबत अन्याय झाल्याचं ते म्हणत आहेत. हा शो स्वार्थी आणि वाईट असल्याचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बोललं जात आहे. आलियाला केलं गेलं ट्रोल- याआधीच्या व्हिडिओमध्ये करणनने आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांची नावं घ्यायला सांगितली तेव्हा सुशांतचं नाव सर्वात खाली ठेवलं होतं. तर तिला कोणाशी लग्न करशील आणि कोणाला मारशील असा प्रश्न विचारला असता तिने मारण्यासाठी सुशांतचं नाव घेतलं होतं. अजून एका एपिसोडमध्ये जेव्हा तिला सुशांत सिंह राजपूत, रणवीर सिंह आणि वरुण धवनला रेट करण्यास सांगितलं तेव्हा तिने कोण सुशांतसिंह असा प्रश्न विचारला होता. याशिवाय अजून एका व्हिडिओमध्ये शाहरुख खान आणि शाहिद कपूर एका पुरस्कार सोहळ्यात सुशांतची खिल्ली उडवताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेता शाहरुख खान आणि शाहिद कपूर यांनी सुशांतची खिल्ली उडवल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ पोहून चाहत्यांनी संताप व्यक्त करत शाहरुख आणि शाहिदला खडेबोल सुनावले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ पाहून प्रसिद्ध गायिका मालिनी अवस्थी यांनी देखील संताप व्यक्त केलाय.'हा व्हिडिओ पाहून मला धक्काच बसलाय. मनोरंजवाच्या नावाखाली हा सगळा विचित्र प्रकार सुरु होता. सुत्रसंचालनाच्या नावाखाली नवोदित अभिनेत्याचा असा अपमान करनं कितपत योग्य होतं? असं म्हणत त्यांनी शाहरुख आणि शाहिदला टॅग केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fIWdCH