Full Width(True/False)

...तेव्हा मला लाँच करायला कोण तयार नव्हतं; अभिषेकनं शेअर केला अनुभव

मुंबई : सिनेइंडस्ट्रीतली , काही नव्या कलाकारांना काम न देणं या मुद्द्यांवरुन बॉलिवूडमधलं वातावरण तापलं आहे. घराणेशाहीचा मुद्दा तर चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय. असं असलं तरी, खुद्द याचा अनुभव मात्र वेगळा आहे. साक्षात महानायक यांचा मुलगा असतानाही २० वर्षांपूर्वी अभिषेकला कुणी लाँच करायला तयार नव्हतं. खुद्द अभिषेकनंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हे सांगितलं आहे. बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन या नावाचा दबदबा खूप मोठा आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिषेक बच्चननं मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. मात्र त्याच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांच्या मनावर फारशी चालली नसल्याचं दिसून येतं. अलीकडेच अभिषेकनं सोशल मीडियावर, 'मला लाँच करण्यासाठी कोणीही तयार नव्हतं' असं सांगत जुनी आठवण सांगितली आहे. अभिषेक लिहितो, '२००० मध्ये जे.पी.दत्ता यांच्या 'रेफ्युजी' या चित्रपटातून मी पदार्पण केलं होतं. मात्र यापूर्वी १९९८ साली राकेश ओमप्रकाश मेहरा 'समझौता एक्स्प्रेस' हा चित्रपट तयार करणार होता. या चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळणार होती. मात्र मला कोणीच लाँच करायला तयार नव्हतं. मला चांगलं आठवतंय, की काम मिळावं म्हणून मी कित्येक दिग्दर्शक, निर्माते यांच्या भेटी घेतल्या. मला काम करण्याची संधी द्या यासाठी विनंतीही केली. मात्र त्यावेळी कोणीच त्यासाठी तयार नव्हतं. त्यामुळे मी आणि राकेशनं स्वत: काही तरी करायचा निर्णय घेतला. यात राकेश 'समझौता एक्स्प्रेस'चं दिग्दर्शन करेल आणि मी अभिनेता म्हणून काम करेन असं आमचं ठरलं होतं. मात्र तो चित्रपट अर्ध्यावरच रखडला.' दरम्यान, यापूर्वी अभिनेता अभय देओल यानं देखील त्याची स्ट्रगल स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे अभयनं देखील तब्बल नऊ वर्षानंतर त्याच्या मनातली खंत सोशल मीडियावर व्यक्त केली.त्याने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटाच्या वेळी घडलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत.अभयनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटाच्यासंदर्भात घडलेल्या गोष्टी शेअर केल्यात. त्याच्या पोस्टमध्ये त्यानं बॉलिवूडमधील पुरस्कार सोहळ्यांवरही निशाणा साधला आहे. २०११मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मध्ये , आणि आणि यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पण केवळ हृतिकला प्रमुख भूमिकेसाठी पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकनं देण्यात आली होती. फरहान आणि अभय यांना सहाय्यक भूमिकेसाठी नामांकनं देण्यात आलं होतं. याचा राग अभयनं त्याच्या पोस्टमध्ये व्यक्त केलाय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hVKYbE