मुंबई- भारत आणि नेपाळमध्ये सध्या सीमा वाद सुरू आहे. या वादात पुन्हा एकदा अभिनेत्री मनीषा कोईरालाने उडी घेतली आहे. या वादावर आपलं मत व्यक्त करत तिने नेपाळला समर्थन दिलं आहे. पण नेमकी हीच गोष्ट भारतीयांना आवडली नाही आणि त्यांनी मनिषाला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केलं. नेपाळच्या संसदेत याच महिन्यात नेपाळचा नकाशा दाखवण्यात आला. यात भारतातील तीन भाग कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा सामील करण्यात आले होते. नेपाळ या भागांवर स्वतःचा हक्क सांगत आहे. पण हे तीनही भाग भारताचे आहेत. आता या प्रकरणी मनीषाने नेपाळची बाजू घेतली आणि पुरती फसली. मनिषाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून पोस्ट शेअर करताना म्हटलं की, 'प्रादेशिक सार्वभौमत्व, राजकीय सार्वभौमत्व आणि आर्थिक सार्वभौमत्व हे सार्वभौम राष्ट्राच्या बरोबरीचं असतं. चला यावर विचार करू.' मनिषाच्या या ट्वीटवर अनेक युझर्सने तिला फैलावर घेतलं. एका युझरने तिच्या पोस्टवर कमेन्ट करत म्हटलं की, 'तू नेपाळच्या परिस्थितीवर टिपणी करत आहेस?' यावर उत्तर देताना मनिषाने लिहिले की, 'मी फक्त विचार करत होते की आज नेपाळ कुठे उभा आहे आणि भविष्यात नेपाळ कुठे जाईल.. भूतकाळ तर आपल्या सर्वांना माहीत आहे.. हे चांगलं आहे की वाईट याबद्दल बोलत नाहीये.. फक्त मनात विचार आला..' सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर मनिषाने पुन्हा एक ट्वीट करत आपली मुद्दा मांडला. मनिषा म्हणाली की, 'मी मनापासून तुम्हाला सांगते की कृपा करून आक्रमक आणि अपमानजनक भाषा वापरू नका. या परिस्थितीत आपण एकमेकांसोबत आहोत. आपली सरकार यावर योग्य तो मार्ग काढेल. तोवर आपण एकमेकांसोबत सभ्यतेने वागू शकतो. मी याबाबतीत आशावादी आहे.' मूळची नेपाळी आहे. मनिषाचे पणजोबा नेपाळमधील मोठे व्यावसायिक होते. तर मनिषा नेपाळचे माजी पंतप्रधान बी.पी. कोईरालाची नात आहे. एवढेच नव्हे तर मनिषाचे वडील स्वतः कॅबिनेट मंत्रीही आहेत. दरम्यान, चीनने आपली आक्रमक विस्तारवादी भूमिका कायम ठेवत मित्र राष्ट्र असलेल्या नेपाळलाही धोका दिला आहे. नेपाळच्या एका गावाचा चीनने ताबा घेतला असल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, चीनने नेपाळचा आणखीही भूभाग घेतला असल्याचे समोर आले आहे. चीनने सीमा बदलासाठी चक्क नद्यांचेही प्रवाह बदलले असल्याचे समोर आले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2VfsMQy