Full Width(True/False)

मराठमोळ्या सिनेमॅटोग्राफरनं आयफोनवर शूट केला हॉलिवूड चित्रपट

मुंबई: एका मराठमोळ्या तरुण सिनेमॅटोग्राफरनं अमिरेकेत अनेक आपल्या नावावर केले आहेत. इतकंच नव्हे तर चित्रपट निर्मितीत त्यानं एक वेगळाच प्रयत्न केलाय. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकितही लॉकडाउन होता. या काळात त्यानं संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग आयफोनवर केलं आहे. त्यानं शूट केलेल्या या चित्रपटाची सध्या चर्चा सरू असून 'अॅमिडस्ट माय ओन' असं या हॉलिवूड चित्रपटाचं नाव आहे. 'सध्या करोनाच्या सावटामुळं चित्रपटनिर्मिती क्षेत्रातही मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळत आहेत. चित्रपटाचं बजेट कमीत कमी कसं करता येईल, याकडं निर्मित्यांचं लक्ष आहे. त्यामुळं आयफोनवर चित्रपटाचं शूटिंग करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. करोनामुळं हॉलिवूडमध्ये देखील अनेक बदल करण्यात आले असून आयफोन हा लो बजेट चित्रपटांचं भविष्य असणार आहे', असं कल्पक म्हणतो. 'अॅमिडस्ट माय ओन' या चित्रपटाचं काम २७ जानेवारी पासून सुरू करण्यात आलं होतं. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचंही कल्पकनं सांगितलं आहे. एक भारतीय ड्रायव्हर त्याच्या मालकाच्या गर्लफ्रेंडच्याच प्रेमात पडतो, अशी या चित्रपटाची कथा आहे',असं, कल्पक सांगतो. आयफोनवर शूटिंग करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं कल्पक सांगतो. त्यामुळं त्याला काही अडचणीही आल्याचं त्यानं सांगितलं. कल्पकनं आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले असून नुकताच त्यानं 'ब्लॅक आउट' या शॉर्ट फिल्मसाठी न्यूयॉर्क सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार जिंकला आहे. तसंच 'आयएम ओके' (आणि नॉयदर आर यू) 'या डॉक्युमेंट्री फिल्मसाठी कॅमेरा ऑपरेटर म्हणून काम केलं होतं. त्या डॉक्युमेंट्रीला प्रतिष्ठित अशा 'बाफटा'कडून अनुदान मिळालं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38etZNg