पटणा- सुशांतची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली आहे असं मानणाऱ्यांमध्ये अभिनेते आहे. नुकतंच त्यांनू सुशांच्या वडिलांची भेट घेतली. स्वतः शेखरने या भेटीचे फोटो आणइ व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी शेखर यांच्यासह सुशांतचा सर्वात जवळचा मित्र आणि निर्माता संदीप सिंहही उपस्थित होता. सरकारकडे सीबीआयची मागणी करण्यासाठी #JusticeForSushant या फोरमची सुरुवात करण्यात आली. शेखर यांच्यामते ही एक ठरवून केलेली हत्या आहे. सुशांतच्या वडिलांना भेटल्यानंतर शेखर यांनी मीडियाशी संवाद साधला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शेखर सुमन सुशांतच्या वडिलांसोबत के.के. सिंहसोबत बसलेले दिसत आहेत. या भेटीबद्दल बोलताना शेखर म्हणाले की, 'सुशांतच्या वडिलांना भेटलो. आम्ही काही मिनिटं एकही शब्द न बोलता बसून राहिलो. ते अजूनही धक्क्यात आहेत. मला वाटतं की दुःख व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग शांत बसणं हाच आहे.' दरम्यान, शेखर सुमन यांनी एक व्हिडिओही शेअर केला. यात ते सुशांतच्या घराबाहेरील मीडियाशी बोलताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'एक लढाई जी संपवायची नाहीये आणि काहीही झालं तरी ही लढाई बंद करायची नाही. मीडियाशी बोलताना शेखर म्हणाले की, आम्ही जस्टिस फॉर सुशांत मोहीम सुरू केली आहे. प्रथमदर्शी जे हे प्रकरण दिसतं ते तसं नाहीये. हे प्रकरण त्याहून मोठं आहे.' शेखर सुमनने नवभारत टाइम्सशी बोलताना सांगितलं की, 'सुशांतने काय पो चे सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्यावेळी त्याला कोणताही पुरस्कार मिळाला नव्हता. सुशांतची केस अशाप्रकारे गडबडीत बंद करण्यावरून संशयाची सुई अनेकांवर आणि प्रत्येकावर जाते. आता याप्रकरणी कोणी बोलेल किंवा नाही. पण मी शांत बसणार नाही. सुशांतशी माझं एक अभिनेत्याचं नातं आहे आणि बिहारच्या मातीचं नातं आहे.' 'सुशांत सिंग राजपूत फाउंडेशन' दिवंगत अभिनेता याच्या स्मृती जपण्यासाठी त्याचे सोशल मीडीया अकाउंट सुरू ठेवण्याचे तसेच त्याचे पाटण्यातील घर स्मारकामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला आहे. याशिवाय सिनेमा, विज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी 'सुशांत सिंग राजपूत फाउंडेशन' (एसएसआरएफ) स्थापन करण्याचेही राजपूत परिवारने जाहीर केले आहे. शनिवारी सुशांतच्या कुटुंबियांनी अत्यंत भावनात्मक असे जाहीर निवेदन केले आहे. 'तो आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि प्रेरणा होता. त्याच्या अकस्मात आणि अकाली निधनाने आमच्या आयुष्यात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दु:खात आमची साथ देणाऱ्या सुशांतच्या प्रत्येक चाहत्यांचे आम्ही ऋणी आहोत, अशा शब्दांत त्यांनी सुशांतच्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Zf7Xpy