Full Width(True/False)

इतर क्षेत्रापेक्षा बॉलिवूडमध्ये घराणेशाही जरा जास्तच आहे: कुमार सानू

मुंबई : अभिनेता याच्या आत्महत्येनंतर सिनेइंडस्ट्रीतली घराणेशाही, काही नव्या कलाकारांना काम न देणं या मुद्द्यांवरुन बॉलिवूडमधलं वातावरण तापलं आहे. या सर्व प्रकारावर गायक यांनी देखील त्यांचं मत व्यक्त करत सुशांतला श्रद्धांजली वाहिली इतर क्षेत्रांच्या तुलनेत बॉलिवूडमध्ये जास्त असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कुमार सानू यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य केलं आहे. सुशांतच्या जाण्याचं दु:ख असून त्यानं त्याचं जीवन ज्या गोष्टीमुळं संपवलं त्या गोष्टी पुन्हा पुन्हा घडू नयेत,असं त्यांनी म्हटलं आहे. 'नवीन पिढीसाठी सुशांत एक प्रेरणास्रोत होता. त्यानं आत्महत्या केली या गोष्टीवर माझाअजूनही विश्वास बसत नाहीए. मी ऐकलं त्यावरून तो खूपच सकारात्मक होता. कमी काळात त्यानं खूप गोष्टी मिळवल्या होत्या. स्वत:ची अशी वेगळी ओळख बनवली होती. बिहारनं देशाला अनेक मोठे कलाकार दिले. सुशांतही त्यापैकी एक होता. त्यानं हे पाऊल उचलायला नको होतं. तसंच सुशांतच्या आत्महत्येमुळं घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. हे सर्वच क्षेत्रात आहे. पण बॉलिवूडमध्ये थोडं जास्तच आहे.तुम्ही चाहते कलाकारांना मोठं करता. पण एखाद्या कलाकाराला चित्रपटात घ्यायचं की नाही, त्याला काम द्यायचं की नाही हे सर्व वरच्या फळीतली मंडळी ठरवत असतात. अनेक तरुण-तरुणी सिनेइंडस्ट्रीमध्ये चमकण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत येतात.त्यांच्यासाठी देखील कुमार सानू यांनी सल्ला दिला आहे. मुंबई आल्यानंतर सिनेइंडस्ट्रीत येण्यापूर्वी एखादी नोकरी हातात असू द्या, तुमच्या राहण्याची आणि खाण्याची सोय होईल अशी नोकरी करत करत तुम्ही तुमचा संघर्ष करायला हवा. हे करत तुम्ही तुमच्या कलाक्षेत्रात काम करायला हवं आहे. असं केल्यास तुम्हाला इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.सुशांत त्याच्या कलेमुळे अमर आहे, एवढंच मी आज बोलू शकतो, असं व्हिडिओच्या शेवटी कुमार सानू म्हणतात. गळफास घेऊन आत्महत्या ३४ वर्षांचा सुशांत त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. नैराश्यग्रस्त अवस्थेत सुशांतनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्येत होता. यावर तो उपचारही घेत होता.छोट्या पडद्यावर 'किस देश में है मेरा दिल', 'पवित्र रिश्ता' या त्याच्या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर 'काय पो छे' सुशांतनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. 'शुद्ध देसी रोमान्स', 'एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी', 'केदारनाथ', 'राबता', 'पिके', 'छिछोरे' या सिनेमांतून त्यानं आपली अभिनयक्षमता सिद्ध करून बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करण्यात यश मिळवलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hTUD2y