नवी दिल्लीः गुगल प्ले स्टोरवर १७ धोकादायक अॅप्स मिळाले आहेत. जे तुमच्या अँड्रॉयड डिव्हाईसला नुकसान पोहोचू शकतात. तसेच पर्सनल डेटा लीक करू शकतात. सायबर सिक्योरिटी फर्म Avast च्या रिपोर्टनुसार, हे अॅप्स HiddenAds कॅम्पेन अंतर्गत भारत आणि साऊथ ईस्ट एशियाच्या युजर्संना लक्ष्य बनवण्यासाठी तयार केले आहेत. या अॅप्सला प्ले स्टोरवर Games सांगितले आहे. परंतु, याचे खरं काम म्हणजे कोणत्याही परवानगी विना जाहिरात दाखवणे आणि युजर्सची माहिती चोरणे हे आहे. तसेच या अॅप्स डिव्हाईसमध्ये आपले आयकॉन लपवू शकतात. तसेच दिसणाऱ्या जाहिराती स्कीप सुद्धा केल्या जाऊ शकत नाही. वाचाः यासारखे काम करतात हे अॅप्स Avast शोधकर्त्यांच्या एका टीमने सुरुवातीला या प्रमाणे एकूण ४७ अॅप्स मिळाले होते. रिपोर्ट मिळाल्यानंतर गुगलने यात ३० अॅप्सला हटवले आहे. अवस्त थ्रेट ऑपरेशन अॅनालिस्ट जाकूब वेवरा यांनी सांगितले की, युजर्संना या अॅप्सला डाऊनलोड करतात. त्यानंतर एक टायमर सुरू होतो. युजर एक निश्चित वेळी यात गेम खेळू शकतात. त्यानंतर टायमर अॅपचा आयकॉन बेपत्ता करते. रिपोर्टनुसार, आयकॉन गायब झाल्यानंतर हे अॅप्स विना परवानगीने जाहिराती दाखवणे सुरू ठेवतात. वाचाः अशी करा सुटका हे अॅप आपला आयकॉन Hide करतात. त्यामुळे जाहिराती कुठून येतात, हे युजर्संना कळत नाही. तसेच डिव्हाईसमध्ये याला शोधूनही हटवणे कठीण होऊन जाते. एक प्रकार आहे. या अॅप्सपासून सुटका करता येऊ शकते. तसचे तुमच्या डिव्हाईसमधील सेटिंगमध्ये जावून अॅप मॅनेजर मध्ये जावे लागेल. या ठिकाणी या अॅपला शोधून अनइन्स्टॉल करू शकता. या अॅप्सला आता पर्यंत १.५ कोटी हून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. यात अनेक अॅप्स अजूनही प्ले स्टोर अॅपवर उपलब्ध आहेत. काही अॅप्स पुढील प्रमाणे आहेत. Skate Board - New, Find Hidden Differences, Spot Hidden Differences, Tony Shoot - NEW, आणि Stacking Guys या अॅप्सचा समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eM5KII