Full Width(True/False)

बर्थडे बॉय अर्जुन कपूर आणि मलायकाची लव्हस्टोरी

अभिनेता अरबाझ खानशी ब्रेकअप झाल्यानंतर मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या प्रेमात असल्याची चर्चा होती. एकदा अर्जुन आणि मलायका जुहूमध्ये झालेल्या एका पार्टीमध्ये एकत्र आले होते. तिथून रात्री उशिरा निघाल्यावर दोघे एकाच कारमधून गेले होते. एका फॅशन शोमध्येही ते एकत्र दिसले होते. त्यामुळं त्यांचं नातं घट्ट झालंय असं बोललं जातं होतं. त्यामुळं नातं लपवण्यात काही अर्थ नव्हता. अर्जुन आणि मलायकानं थेट सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती.तसंच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये अर्जुननं तो सिंगल नसल्याची कबुली देत आडमार्गानं आपलं कुणाशी तरी जुळल्याची कबुली दिली होतं.तर, दुसरीकडं मलायकानं इन्स्टाग्रामवरून तिच्या नावातील 'खान' हे आडनाव काढून टाकून नव्यानं सुरुवात करण्याचे संकेत दिले होते.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या प्रेमाची चर्चा जोरात सुरू होती. त्यामुळं सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर असायच्या. मलायकानं अर्जुनबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोमध्ये त्या दोघांतलं जवळचं नातं स्पष्टपणे दिसून येत होतं. ते दोघं एका समुद्रकिनाऱ्यावर बसलेले दिसतात. या फोटोसोबत मलायकानं लिहिलं होतं की 'सूर्य, तारे, प्रकाश, आनंद... २०२०.' या फोटोवरून त्या दोघांनी एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली दिली होती.

लॉकडाऊन दरम्यान अर्जुन कपूर घरीच होता.तो चाहत्यांची सोशल मीडियावरुन संवाद साधत होता. आणि त्यांना एंटरटेन करत होता.असंच त्यानं इन्स्टाग्रामवर 'टू डू' हा गेम खेळायला सुरूवात केला. त्यादिवशी त्या खेळाडूनं काय करायचं नाही हे त्या खेळाच्या माध्यमातून सांगितलं जातं. या गेममध्ये अर्जुनला 'आपला फोन वापरणं बंद करा' असं उत्तर मिळालं होतं. त्यानंतर मलायकाला टॅग करत अर्जुननं हे आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये शेअर केलं होतं आणि 'याच्याशी सहमत असणाऱ्या आणखी एका व्यक्तीला मी ओळखतो' असं त्यानं म्हटलं होतं. त्यामुळं अर्जुनचं सतत फोन वापरणं मलायकाला आवडत नसावं हे कळून येतं.

मलायका लग्नासाठी पूर्ण तयार आहे. पण अर्जुनला इतक्यात लग्न करायचं नाही. एवढंच नाही तर अर्जुनच्या कुटुंबालाही हे लग्न लवकर व्हावं असं वाटत आहे. पण स्वतः अर्जुननं हे लग्न लांबणीवर नेलं आहे. त्याच्या मते, योग्य वेळ आल्यावर तो लग्न करेल. आता या गोष्टीत किती तथ्य आहे हे तर फक्त मलायका आणि अर्जुनलाच माहीत. एका मुलाखतीत अर्जुनला लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, 'माझ्या घरातल्यांना हे चांगलंच माहीत आहे की, मी ऐकतो सगळ्यांचं पण मला जे वाटतं तेच मी करतो. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी जे करेन ते योग्यच असेल. मी लहानपणापासूनच समजूतदार होतो, त्यामुळे घरच्यांना याची पूर्ण कल्पना आहे की, मी जो काही निर्णय घेईन तो घरातल्यांचा विचार करूनच घेईन. जेव्हा मला वाटेल की मला आता सेटल होण्याची गरज आहे तेव्हा मी लपवणार नाही.'



from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31gsVHq